Ambadas Danve : लड़ेंगे भी… जीतेंगे भी…. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पत्र
•विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून मानले आभार, तसेच कार्यकर्त्यांच्या अभिनंदनही केले
मुंबई :- राज्यात लोकसभा निवडणुकीचे कल येत आहे. आतापर्यंतचे परिस्थिती पाहता राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला अधिक त्यांनी दिसत आहे अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे निश्चितच यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस यश मिळणार असल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेचा बंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बंड हा महाराष्ट्रातील जनतेने नाकारला असून सहानुभूतीच्या जोरावर महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राचा कल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिल्याचे दिसून येते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होऊन देशात कोण कोणाचे सरकार येणार आणि राज्यात कोणाचा बोलबाला चालणार हे पाहणे उस्तुकल्याचे ठरले आहे. विजयपूर्वीच राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच दिल्लीच्या दिशेने धावणाऱ्या विजयाराथाचे चाकण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढले आहे असे पत्रात उल्लेख करत विरोधी पक्षातील नेत्यांनाही अंबादास दानवे यांनी टोला लगावला आहे.
अंबादास दानवे यांचे पत्र..महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन…!
दिल्लीच्या दिशेने धावणारा स्वयंघोषित चाणक्यांचा विजयाचा रथ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्रात रोखण्याचा पराक्रम केला आहे. हा रथ नुसताच रोखला नाही तर या रथाचे चाकही मोडले आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतरही मस्तवाल शक्तींना योग्य संदेश आणि याविरुद्ध लढा देणाऱ्यांना दिशा देण्याचे काम महाराष्ट्राच्या मातीने, येथील लोकांनी कायम केले आहे. हाच कित्ता गिरवून आज महाराष्ट्राने दिल्लीला संदेश दिला आहे.
हे स्वयंघोषित चाणक्य महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट आलेलं असताना कधीच येथील लोकांना धीर देत नाहीत, मदत तर लांबची बात आहे. मात्र निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची जनता आपल्याला साथ देईल, असे म्हणून गृहीत धरतात. आज त्याला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार चपराक देत हे मतदान केले आहे महागाईच्या विरोधात.. बेईमानीच्या विरोधात.. महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेशला उद्योग पळवण्याच्या विरोधात.. खतांच्या किंमती वाढवून खात्यात किसान सन्मान निधीच्या नावाने टाकल्या जाणाऱ्या भिकेच्या विरोधात.. पक्षफोडीचे बीज पेरणाऱ्यांच्या विरोधात.. जुमलेबाजीच्या विरोधात.. आंदोलनाला बसलेल्या महिला खेळाडूंकडे केलेल्या दुर्लक्षच्या विरोधात.. मणिपूरच्या महिलांवर झालेल्या बेसुमार अत्याचाराच्या
विरोधात.. महाराष्ट्रातील मतदारांपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेला संदेश महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामान्य मतदारांपर्यंत योग्यपणे पोहचवला. परिणामाची, उन्हाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी निकराने दिलेल्या लढ्याचे हे फळ आहे. यासाठी या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे. आता थांबायचे नाही! निम्मी लढाई आपण लोकसभेच्या निमित्ताने जिंकली आहे. निम्मे यश विधानसभेत मिळवून अहंकाराच्या टोकावर बसलेल्या लोकांना धडा शिकवायचा आहे. दिल्ली तो सिर्फ ट्रेलर है.. विधानसभा का पिक्चर अभि बाकी आहे..
लढेंगे भी.. जितेंगे भी !! जय हिंद, जय महाराष्ट्र..