पुणे

Dr. Digambar Pathrudkar : जेष्ठ धन्वंतरी काळाच्या पडद्याआड ; डॉ. दिगंबर पाथ्रुडकर

( दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी )

Dr. Digambar Pathrudkar Died : दौंड, ता.२९ यवत पंचक्रोशीतील जेष्ठ धन्वंतरी म्हणुन ओळख असलेले डॉ. दिगंबर पांडुरंग पाथ्रुडकर ( वय – ९४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

जुन्या काळात ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी डॉक्टर राजी नसत. त्यावेळी १९६० साली त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा करण्यास सुरुवात केली. यवत परिसरातील २५ गावातील नागरिक त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असत. दौंड, शिरुर व पुरंदर तालुक्यातील नागरिकांचा यात समावेश होता.

दिगंबर पाथ्रुडकर Dr. Digambar Pathrudkar यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरोग्य विभागात यवत प्राथमिक केंद्रात रुजू झाले. १९६१ ते ६८ दरम्यान ते सरकारी डॉक्टर होते. पुढे त्यांची बदली झाल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि यवत परिसरातील त्यांची रुग्णांशी जुळलेली नाळ कायम ठेवली. यवत मध्ये स्वताचा खाजगी दवाखाना सुरू केला.

गोरगरीब रुग्णांना त्यांनी कायम झुकते माप दिले.पैसे नसतील तरी उपचार तर केलेच वेळ प्रसंगी स्वतः पैसे खर्च करून औषध देत असत. यामुळे समाजात त्यांना विशेष मान होता. १९७० च्या दशकात दळणवळणाची साधणे खूप कमी होती. त्यांनी वेळ प्रसंगी स्वतः च्या दुचाकी व चारचाकी मधून आजूबाजूच्या गावांमध्ये जात रुग्णांवर उपचार केले.

सामाजिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग असे. गजानन पतसंस्थेची स्थापना, नूतन तरुण मंडळ गणेशोत्सव, गावातील गणेश मंदीर जीर्णोद्धार आदी कामात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. गावातील तुकाई देवी मंदीर ट्रस्टचे संस्थापक खजिनदार होते. परंपरागत वारकरी संप्रदायाचा वसा त्यांनी कायम जपला. पंढरीची वारी कधीही चुकू दिली नाही.

वैद्यकीय व्यवसायाबरोबरच त्यांना अवांतर वाचनाची मोठी आवड होती. विविध पुस्तकांचा त्यांचा मोठा संग्रह होता. शेतीची देखील त्यांना मोठी आवड होती. वेळ काढून ते शेतीवर देखील जातीने लक्ष देत असत.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. पराग पाथ्रुडकर Dr. Digambar Pathrudkar यांचे ते वडील होत.

Web Title: Dr. Digambar Pathrudkar: Behind the scenes of Jeshtha Dhanvantari era; Dr. Digambar Pathrudkar Died Due To Some Illeness

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0