क्राईम न्यूजमुंबई
Trending

Jalna Anticorruption Bureau News : ग्रामपंचायत कार्यालयातील रोजगार सेवकाला एसीबीकडून अटक

Jalna Anti corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना विभागाची मोठी कारवाई ; लाचखोर रोजगार सेवकाला अडीच हजाराची लाच घेताना अटक

जालना :- राममूर्ती ग्रामपंचायत कार्यालयातील रोजगार सेवक भाऊसाहेब काशिनाथ गिराम (48 वर्ष) अडीच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना Jalna Anti corruption Bureau News यांनी अटक केली आहे. शासनाकडून विहिरी मंजूर झालेली असून स्वतः जॉब कार्ड धारक यांनी विहिरीवरील मजुराचे मास्टर मंजूर करून देण्यासाठी स्वतःचे पाचशे रुपये आणि इंजिनियर रत्नपारखे यांच्यासाठी दोन हजार रुपये असे एकूण अडीच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आले आहे.  Maharashtra Latest Anti Corruption Bureau News

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना कारवाई

यातील तक्रारदार यांची मौजे राममूर्ती शिवारात गट क्र. 180 मध्ये 40 आर जमीन आहे. जमिनीवर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तक्रारदार यांना शासनाकडून विहीर मंजूर झालेली असून स्वतः जॉब कार्ड धारक आहे. दि.27 मे 2024 रोजी आरोपीने तक्रारदार यांना चालू महिन्यातील नमूद विहिरी वरील मजूरांचे मस्टर मंजूर करून देण्यासाठी स्वतः चे 500 रू. आणि इंजिनिअर रत्नपारखे यांचेसाठी दोन हजार रू. लाचेची मागणी लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान केली होती. त्यावरून सापळा कारवाई दरम्यान आज दिनांक 28 मे 2024 रोजी आरोपी यास पंचायत समिती, जालना आवारात पंचासमक्ष दोन हजार 500 लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपी भाऊसाहेब गिराम यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन कदीम जालना ज़ि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.  Maharashtra Latest Anti Corruption Bureau News

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना,पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश बुजाडे , कृष्णा देठे, शिवाजी जमधडे अँटी करप्शन ब्युरो ,जालना यांनी ग्राम पंचायत येथील रोजगार सेवकाला अटक केले आहे.

Web Title : Jalna Anticorruption Bureau News : ACB arrested a worker in Gram Panchayat office

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0