मुंबई

NILESH RANE : निलेश राणे यांचा मंत्री छगन भुजबळ यांना इशारा

NILESH RANE ON CHHAGAN BHUJBAL : छगन भुजबळ यांना आवरलं पाहिजे….. बीजेपीला डिवचत….निलेश राणे

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पदाधिकारी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ CHHAGAN BHUJBAL यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको असे विधान करत मंत्री छगन भुजबळ CHHAGAN BHUJBAL यांनी महायुतीला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर महायुतीमध्ये आता विधानसभेवरून मिठाचा खडा पडणार का प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच छगन भुजबळ यांच्या या विधानावर नीलेश राणे NILESH RANE यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही बोललेलं सहन करणार नाही असे म्हणत नीलेश राणे यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे.

नीलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, “छगन भुजबळांना आवरलं पाहिजे…मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं???
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही.
आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही.
आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.

मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?

एका कार्यक्रमात बोलतांना भुजबळ म्हणाले होते, “एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. महायुतीमध्ये सामील होताना आपल्याला 80 ते 90 जागा मिळतील असे सांगितले होते. आता तेवढ्या 80 ते 90 जागा मिळाल्या तर 50, 60 निवडून येतील”, असे भुजबळ म्हणाले होते.

Web Title : NILESH RANE : Nilesh Rane’s warning to minister Chhagan Bhujbal

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0