Dombivli Crime News : घरामध्ये चोरी ; सोन्या चांदीच्या दागिने चोरट्याने केले लंपास
•डोंबिवली मध्ये चोरी ; नऊ लाख किंमतीचे दागिने चोरीला,
डोंबिवली :- डोंबिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या अनिरुद्ध पुरुषोत्तम फाटक (44 वर्ष) हे कामानिमित्त 24 मे ते 26 मे दरम्यान बाहेर गेले असता घरात कोण नसल्याचा संधीचा फायदा घेत चोरट्यांनी फाटक यांच्या घरात जवळपास नऊला कोण अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर मोठा डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.
चोरट्यांनी फाटक यांच्या घराच्या मागील खिडकीचे लोखंडी ग्रीन तोडून आत मध्ये प्रवेश केला. प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे जवळपास नऊ लाख चार हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केले आहे. घडलेल्या घटनेबाबत अनिरुद्ध यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुपडे हे करत आहे.