मुंबई

Bangladeshi With Fake Indian Documents : बांगलादेशी नागरिकांचा रॅकेट,शासनाचा ढिसाळ कारभार, घुसखोर वीस बांगलादेशी नागरिकांकडे भारताचे बनावट कागदपत्रे

Bangladeshi With Fake Indian Documents बोरीवली पोलिसांची मोठी कामगिरी ; वीस बांगलादेशी घुसखोर नागरिकांना केले अटक,

बोरिवली :- भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशीय नागरिक शासनाच्या नाकावर टिचून खोटे कागदपत्र सादर करत भारतात अवैधरीत्या वास्तव्य करत आहे. प्रशासक डोळे बंद करून बघायचे भूमिका कशी घेताय असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. बोरीवली पोलिसांनी तब्बल वीस बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश केला आहे. भारतामध्ये सर्रास वावर करत असून भारतातील खोटे कागदपत्र सादर करून भारतात वास्तव्य करत असल्याची घटना बोरीवली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घुसखोर बांगलादेशी हे नागरिक राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक करून तुमच्याजवळ कागदपत्रे विचारले असता कोणतेही कागदपत्र नसून सर्व कागदपत्र हे बनावट असल्याचे पोलिसांना निदर्शनाला आले होते. Bangladeshi With Fake Indian Documents

वीस बांग्लादेशीय लोकांच्या रॅकेटचा केला पर्दाफाश

राजीव जैन , अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, आनंद भोईटे , पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-11, मुंबई, सुनिल जायभाये , सहायक पोलीस आयुक्त, बोरीवली विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व बोरीवली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांचे देखरेखीखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक काळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके , पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर , पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील व पोलीस पथक पोलीस हवालदार शेख , राणे ,सावर्डेकर,केसरे , पोशिक्र रेवाळे , गर्जे या पोलीस पथकाने आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास करुन नालासोपारा , विरार , पुणे येथुन आणखी बांगलादेशी नागरिक लाहत असण्याची माहिती काढून घेतली पोलिसांनी त्वरित संबंधित ठिकाणी आपले पथके पाठवून आणखी 17 बांग्लादेशी नागरीकांना ताब्यात घेवुन अटक केली आहे. Bangladeshi With Fake Indian Documents

खोटे कागदपत्र
आरोपींनी भारतातील वास्तव्यादरम्यान भारतीय , पासपोर्ट , व्हीसा ,जन्म प्रामाणपत्र , आधारकार्ड , पॅनकर्ड , मतदानकार्ड इत्यादी बनावट भारतीय कागदपत्रे तयार केलेली होती. त्यानुसार बांग्लादेशातून अवैधमार्गाने भारतात आणुन बनावट भारतीय कागदपत्रे व भारतीय पासपोर्ट, व्हीसाव्दारे मध्य पूर्वेतील देशामध्ये पाठविणाऱ्या बांग्लादेशी रॅकेट उघड करुन पुणे येथुन बनावट कागदपत्रे व पासपोर्ट बनवुन देणाऱ्या 2 भारतीय एजंट यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. Bangladeshi With Fake Indian Documents

न्यायालयाने केली कारवाई आरोपींना दिली शिक्षा
24 मे 2024 रोजी 8 वे न्यायालय, किल्ला कोर्ट, आझाद मैदान, बोरीवली पोलीस ठाणे, मुंबई यांनी नमुद गुन्ह्यतील 20 अवैध घुसखोर बांग्लादेशी नागरीकांनी 8 महीने कारावास व 4000 रुपये दंड व दंड न भरलेस आणखी 16 दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. Bangladeshi With Fake Indian Documents

शिक्षा लागलेल्या आरोपींची नावे
1)सुमन मोमीन सरदारउर्फ विष्वजित बाटुल मंडल, (31 वर्ष), खुलना, बांगलादेश
2)ओमर फारुख मोल्लाउर्फ नासिर षाहजहान उदिदन,(27 वर्ष), झिनेदा, बांगलादेश
3)सलमान अयुब खानउर्फ अब्दुलसलाम आयुब मोडल, (34 वर्ष), सतखिरा, बांगलादेश
4) अतिकुल अकिलुद्दीन मुल्ला,(23 वर्ष) खुलना, जिल्हा झिनेदा, बांगलादेश,
5)सैदुल सफरअली गामन,(27 वर्ष )जिल्हाढाका, बांगलादेश,
6)मुस्ताकअली कुतुबुद्दीन तरबदार,(22 वर्ष) खुलना, बांगलादेश,
7)फिरोज उलहक मोल्ला,(21 वर्ष) झिनेदा, बांगलादेश,
8)रहिम मोईद्दीन मंडल उर्फ रहिमुद्दीन मुल्ला,(32 वर्ष), खुलना, बांगलादेश
9)रॉनी शफीकुल शेख उर्फ रशीद उलइस्माम मोनीर होलादार,(22वर्ष),खुलना, बांगलादेश,
10)इनामुल कमल सरदार,(22 वर्ष)जिल्हा खुलना, बांगलादेश,
11)मसुद राणा इद्रीस गाझी,(22 वर्ष),जिल्हा खुलना,बांगलादेश,
12)रिपोन रोमेन ढाली,(34 वर्ष) जिल्हा खुलना, बांगलादेश
13)मोनीरुल मोहमद मुल्ला,(25 वर्ष) खुलना, बांगलादेश,
14)आरीफ शौकत विश्वास,(25 वर्ष)झिनेदा, जिल्हा खुलना, बांगलादेश,
15)मसुम बिल्ला अश्रफ मंडल,(25 वर्ष) खुलना, बांगलादेश,
16)दिलावर इद्रीस गाझी,(23 वर्ष),जिल्हा खुलना, बांगलादेश,
17)रब्बी कजल मंडल,(25 वर्ष),जशोर, बांगलादेश.
18) मुबीन जावेद मंडल उर्फ मुबीन सोईदुल इस्लाम,(26 वर्ष) पोलीस ठाणे सवर, जिल्हा व विभाग ढाका, बांगलादेश
19) सुजौन शोरीफउल शेख, (26 वर्ष) पुणे. मुळगाव गेणुखाली, पोठाणे जिगूरगा, जैसेर, खुलना,बांगलादेश.
20) मिठु शोफीकुल शेख, ( 28 वर्ष ) कात्रज, पुणे. मुळगाव रत्नापुर, कालगंज,सातखिरा, खुलना, बांगलादेश. Bangladeshi With Fake Indian Documents

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0