Pune Porsche Accident : मुजोर विशाल, सुरेंद्रनाथ अग्रवाल बिल्डरच्या अडचणी वाढल्या : चालकाला डांबून अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल : पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडून कठोर कारवाई
गुन्हे शाखा उपायुक्त अमोल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरेंद्रनाथ अग्रवाल याला अटक विशाल अग्रवाल याच्या अडचणीत वाढ Pune Porsche Acciden
पुणे, दि. 25 मे, महाराष्ट्र मिरर : मुबारक जिनेरी
कल्याणीनगर अपघातात आरोपी असलेल्या विधीसंघर्षित याला वाचवण्यासाठी चालकाला डांबून ठेवून अपहरण केल्या प्रकरणी सुरेंद्र कुमार अग्रवाल व विशाल अग्रवाल यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Porsche Accident पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुजोर बिल्डर पिता पूत्रावर कडक कारवाई करत पुणेकर जनतेमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी चालक, गंगाधर शिवराज हेरीक्रुब, वय 42 वर्ष, रा.पुणे याने तक्रार दिल्यावरून आरोपी
- सुरेंद्र अग्रवाल रा. वडगावशेरी पुणे
- विशाल अग्रवाल रा. वडगावशेरी पुणे
यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात कलम:- 322/2024 भा.दं.वि.कलम 342, 365, 368, 506, 34. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी विशाल अग्रवाल हा दुसऱ्या गुन्ह्यात अटक आहे तर
सुरेंद्र अगरवाल याला आज गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.
चालक यांनी फिर्याद दिली की, दिनांक 19/05/2024 रोजी रात्रौ ते दिनांक 20/05/2024 रोजी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन येथुन मी माझे घरी जात असताना सुरेंद्र आगरवाल सरांनी मला येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मला त्याचेकडे बोलावुन घेवुन धमकी देवुन माझ्या इच्छेविरुध्द त्यांचेकडील बीएमडब्ल्यु गाडीमध्ये बसवुन, ब्राम्हा सनसिटी येथील त्यांचे बंगल्यात आणुन, सुरेंद्र आगरवाल सर व विशाल आगरवाल सर यांनी आपआपसात संगणमत करुन मला धमकावुन माझा मोबाईल फोन काढुन घेवुन त्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर लपवुन ठेवण्याच्या उददेशाने डांबुन ठेवून धमकाविले कीं त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व “ त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख ” अशी धमकी दिली. Pune Porsche Acciden