Nalasopara Crime News : 25 किलो गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना केले अटक, आरोपीमध्ये महिलेचाही सहभाग

•पेल्हार गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; पाच लाखाहून अधिक किमतीचा गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोन आरोपींना केले अटक
नालासोपारा :- 25 किलो गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या दोन आरोपींना पेल्हार पोलीसांनी अटक केली असून आरोपीकडून तब्बल 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्व गुण्यांमध्ये महिलेचाही सहभाग असल्याच्या पोलिस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी महिलेलाही अटक केली आहे.
पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलीस नाईक अशोक परजने यांना मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे 22 मे च्या दुपारच्या सुमारास नालासोपाराच्या सोपारा फाटा वर एक महिला आणि पुरुष यांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित सोपारा फाटा येथे पोलीस निरीक्षक शकील शेख पुणे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुफान भोपळे पोलीस पथक यांनी सापळा रचला होता. आरोपी येतात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केला असता त्यांच्याकडे बेकायदेशीर रित्या विक्री करण्याकरिता आणलेला गांजा पोलिसांना आरोपी येतात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केला असता त्यांच्याकडे बेकायदेशीर रित्या विक्री करण्याकरिता आणलेला गांजा पोलिसांना आढळून आला होता. तब्बल 25 किलो गांजा या आरोपींनी करण्यासाठी आणला असून त्याची किंमत पाच लाख 61 हजार रुपये आहे. पोलिसांनी मुक्तार गोस सय्यद (31 वर्ष) आणि महिला (49 वर्ष) दोघांना ताब्यात घेतली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात अधिनियमन 1985 चे कलम 8 (क), 20 (च) ii (क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील सुरु आहे.
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 विरार, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुका विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारे, पेल्हार पोलीस ठाणे, कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), शकील शेख, पोलीस निरीक्षक (प्रशासन), पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल रोगर, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार अशोक परजने, रामनाथ खेडकर, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, राहुल करें, दिलदार शेख, अनिल साबळे, निखील मंडलिक, सुजय पाटील, म.पो.अं. शबनम खलिफा,कल्याण शिंदे सर्व नेम. पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.