ऑनलाईन फसवणूक ; युट्युब वर, लाईव्ह टास्क, हॉटेल,मुव्ही रेटिंग देण्याचे काम असल्याचे सांगून वर्क फ्रॉम होम असल्याचे भासवून फसवणूक झाल्याची घटना
Mira Road Cyber Crime News Cyber Police Arrested Fraudster : सायबर पोलिसांकडून यशस्वी कामगिरी ; काशिगाव पोलिसांनी फसवणूक करून गुंतविलेले पैसे परत देण्यास यश
मिरा रोड :- वर्क फ्रॉम होम Work From Home च्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना मिरा रोड Mira Road ला घडली आहे. श्रीहरी पडवगीडू (42 वर्ष) यांना वर्क फ्रॉम होमच्या Work From Home Scam नावाखाली यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टास्क हॉटेल मूव्ही, ऑनलाइन रेटिंग देऊन अधिक नफा मिळण्याचा असल्या त्याकरिता गुंतवणूक करण्यास सांगितले.अधिक नफाच्या अमिषाला बळी पडत श्रीहरी यांनी पाच लाख 16 हजार 775 रुपये गुंतवणूक केले. कालांतराने त्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारे परतावांना मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याच्या त्यांच्या लक्षात आले होते. Mira Road Latest Cyber Crime News
काशिगांव पोलीसांकडून फसवणुकीचे जाळे उघडकीस
युट्युब लाईक्स पासून हाॅटेल स्टे पर्यंत : ऑनलाईन रेटिंग ची गडद बाजू उघड झाली
श्रीहरी यांनी घडलेल्या प्रकरणाबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात पोलिसांनी Kashmira Police Station व्यक्तीच्या विरोधात सायबर गुन्हेगारी Cyber Crime संदर्भात असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66(सी),66 (डी) सह कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तक्रारीबाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालया कडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिगांव पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने साक्षीदार श्रीहरी यांची फसवणुक झालेली 5 लाख 16 हजार 785 रुपये रक्कमे पैकी 5 लाख 16 हजार 785 रुपये अशी संपूर्ण रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mira Road Latest Cyber Crime News
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली काशिगांव पोलीस ठाणेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे. (Mira Road Work From Home Scam News)