Mumbai Loksabha Elections Update : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांवर 9 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान झाल्याने या दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
•महाराष्ट्रात 09.00 वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान झाले
मुंबई :- महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 07.00 वाजल्यापासूनच लोक मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व 13 जागांवर 6.33 टक्के मतदान झाले होते.
सर्व मतदारसंघातील सकाळी 7 ते 9 पर्यंतची टक्केवारी
- भिवंडी – 4.86%
- धुळे – 6.92%
- दिंडोरी – 6.40%
- कल्याण- 5.39%
- दक्षिण मुंबई – 6.19%
- उत्तर मध्य – 6.01%
- उत्तर पूर्व – 6.87%
- दक्षिण – 5.34%
- दक्षिण मध्य – 7.79%
- नाशिक – 6.45%
- पालघर- 7.95%
- ठाणे – 5.67%
खासदार श्रीकांत शिंदे यांचे त्यांच्या मातोश्रींनी औक्षण केले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे. त्यामुळे या देशाचे नेतृत्व करण्यासाठी मोदींना पुन्हा संधी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करावे”, असे शिंदे म्हणाले.
रवींद्र वायकर यांनी मतदान केले. यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, सर्वांनी योग्य उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ही देशसेवेची लढाई आहे.
विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.
ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, बरेच लोक सोडून जाणं हे पहिल्यांदा पाहतोय. विजय आमचाच होणार आहे असे म्हंटले
नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्यासह माध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.