Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत जैन बिल्डरकडून वृद्धाची दीड कोटीची फसवणूक ; रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
• The Mysterious Scam Behind the Dream Home in Navi Mumbai तब्बल दीड कोटीच्या जवळपास रक्कम देऊनही बिल्डर कडून घर नाही…”ज्येष्ठ नागरिकाची अवस्था कोणी घर देत का घर…”
नवी मुंबई :- घणसोली सेक्टर 11 येथील एका टॉवरमध्ये वृद्धाला फ्लॅट विक्रीचा व्यवहारांत सुमारे दीड कोटीला गंडवणाऱ्या भैरव ग्रुप सविता होममेकर्स एलएलपीच्या मालकासह सात जणांवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने बिल्डर लॉबीत खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ नागरिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Navi Mumbai Crime News
निवृत्तीनंतर जो बचत निधी भेटला आहे त्यातून घराचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे कुटुंबाने घणसोली सेक्टर-११, गोल्ड क्रिस्ट रेसिडेन्सी फ्लॅट नंबर जे 703, प्राइड त्री ओ विंग प्लॉट नंबर 7 या ठिकाणी 2 शयनकक्ष असलेले सदनिका ज्याची किंमत एक कोटी 20 लाख 176 रुपयाला विकत घेतली होती. एवढे पैसे देऊनही बिल्डर कडून घर देण्याबाबत टाळाटाळ होती. Intriguing and Mysterious: The Secret Behind the Retirement Scam in Navi Mumbai – Who is Behind It?ज्येष्ठ नागरिकांची मराठी सिनेमातील एक प्रसंग आठवत कोणी घर देत का घर… अशी परिस्थिती आली आहे. Navi Mumbai Crime News
हतबल झालेले निवृत्ती रघुनाथ शिंदे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात भैरव ग्रुप सविता होममेकर्स एलएलपीचे मालक यांच्या विरोधात म्हणजेच विवेक मदन जैन, अक्षय मदन जैन, पदनलाल पुखराज जैन, अशीका जैन, प्राची जैन, प्रगती रस्तोगी, संतोष म्हस्के यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. Navi Mumbai Crime News
तक्रारीमध्ये शिंदे यांनी त्यांच्याबरोबर झालेली फसवणूक बाबत उल्लेख केला आहे. कोपरखैरणे येथे राहणारे शिंदे यांनी निवृत्त झाल्यावर आलेली आणि आजपर्यंत बचत केलेल्या रकमेतून आरोपींकडून घणसोली सेक्टर येथे गोल्ड क्रिस्ट रेसिडन्सी, फ्लॅट नं. जे 703, प्राइड त्री ओ विंग, प्लॉट नं 7 या ठिकाणी 2 शयनकक्ष असलेली सदनिका 1 कोटी 20 लाख 176 रुपयांना विकत घेतली होते. हा व्यवहार 1 जुलै 2021 मध्ये पूर्ण झाला. मात्र अद्याप शिंदे यांना ताबा मिळालेला नाही. दरम्यान आरोपींनी फिर्यादी शिंदे यांना सदनिकेचे खोटे खरेदी खत व कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ ॲर्टनी) तयार करून दिले. याशिवाय सदनिका खरेदी तसेच फिर्यादी यांचे खरेदी खतामधील स्टील्ट पार्किंग नमूद असताना देखील मेकॅनिकल पार्किंग दिली गेली आहे. याशिवाय आरोपींनी त्यांच्या सोयीनुसार फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावे स्टॅम्पपेपर खरेदी करून तो बनावट तयार करून त्यावर बेकायदेशीर मजकूर तयार करून बनावट संमतीपत्रावर जबरदस्तीने ह्या करण्यासाठी दबाव टाकला. त्यावर शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी सह्या केल्या नाहीत म्हणून फिर्यादी यांना सदनिकेचा ताबा नाही तसेच फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय सदर सदनिका पाहण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना सदनिकेत प्रवेश करू दिला नाही.एवढ्यावर न थांबता आरोपींनी इंग्रजीतून मूर्ख आहात अशी शिवीगाळ केली गेली. असा आरोप आरोपींनी तक्रारीत केला आहे. शेवटी कंटाळून फिर्यादी शिंदे यांनी सदनिकेपोटी दिलेले 1 कोटी 20 लाख 176 आणि ताबा अद्याप दिला नाही म्हणून 31 लाख 89 हजार 290 रुपये अशी एकूण रुपये 1 कोटी 51 लाख 89 हजार 460 ची फसवणूक केली. असा तक्रार अर्ज रबाळे पोलीस ठाण्यात देण्यात आला होता. या अर्जाची शहानिशा करून आरोपींच्या विरोधात संगनमत करून आर्थिक फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे बनवणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. Navi Mumbai Crime News