Kalyan Crime News : कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, बस डेपो परिसरात एकच खळबळ
•महात्मा फुले पोलिसांची कारवाई ; मारहाण करून खून झाल्याचा पोलिसांचा संशय
कल्याण :- बुधवारी (15 मे) दुपारी 12.30 वाजता सुमारास कल्याण पश्चिम येथे बांधकाम चालू असलेल्या जुन्या एसटी डेपोच्या ब्रिज खाली एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्याला देण्यात आली होती.
पोलिसांनी घटनास्थळी ची पाहणी करून त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाहिल्यास त्याच्या शरीराच्या हातावर,पायावर आणि पाठीवर ठीक ठिकाणी मारहाण करून जीवेठार मारल्याचा प्रकार पोलिसांना संशय दिसून आला आहे. तसेच त्या मृतदेहाचा खून झाल्याचा पोलिसांनी प्राथमिकता माहिती दिली आहे. त्या अज्ञात व्यक्तीचा अज्ञात कारणावरून खून झाल्या प्रकरणे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्व घटनांचा पोलिस निरीक्षक गुन्हे नाईक कसून तपास घेत आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून चालू आहे.