महाराष्ट्र
Trending

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 4 जून पासून आमरण उपोषणाला बसणार

Manoj Jaranage Patil News : आंतरवाली सराटी मध्ये, बोलो जरांगे पाटील यांचे 4 जून पासून पासून उपोषण, 8 जुनला नारायण गडावर घेण्यार सभा

जालना :- लोकसभेच्या निकालाच्या (Loksabha Election) दिवशी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील पुन्हा 04 जून पासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील करत असल्याचे सांगितले जात आहे. या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमुळे आली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. Manoj Jarange Patil Latest Update

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, जोपर्यंत सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणात पडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. Manoj Jarange Patil Latest Update

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही. किंवा कोणालाही निवडून आणा, असे म्हणालेलो नाही, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आमचा महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मात्र, मी समाजाला कोणाला पाडायचे ते पाडा असे, म्हणालो होतो. त्यामुळे कोणाला पाडायचे हे समाजाला कळाले होते, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. Manoj Jaranage Patil Hunger Strike On 8 June At Narayan Fort

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0