Ghatkopar hoarding collapse : ..तर घाटकोपरमध्ये 14 लोकांचे प्राण वाचले असते, BMC ने 2 आठवड्यांपूर्वी होर्डिंग हटवण्याची नोटीस दिली होती
Ghatkopar hoarding collapse : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. किरीट सोमय्या यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांनी बेकायदेशीर होर्डिंग्सबाबत बीएमसीकडे तक्रार केली होती
मुंबई :- घाटकोपर परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. मोठे होर्डिंग कोसळून Ghatkopar hoarding collapse 14 जणांचा मृत्यू झाला तर 74 जण जखमी झाले. आता या घटनेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य समोर आले आहे.भाजप नेते किरीट सोमय्या Kirit Somiyan यांनी काही दिवसांपूर्वी बीएमसीला पत्र BMC Letter लिहून घाटकोपरमध्ये लावण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंगबाबत Ghatkopar hoarding collapse तक्रार केली होती. यानंतर बीएमसीने ईजीओ मीडियाला नोटीसही दिली होती, मात्र काही कारवाई होण्यापूर्वीच काल मोठी दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. किरीट सोमय्या आज याबाबत पत्रकार परिषदही घेणार आहेत.
पेट्रोल पंपावर 100 फूट उंच बेकायदेशीर फलक कोसळल्याने सुरुवातीला 100 हून अधिक लोक अडकले होते, त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होर्डिंग मालकाचे नाव भावेश भिडे असल्याचे सांगण्यात आले आहे.
परवाना नसल्यामुळे हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. या घटनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांना मुंबईतील सर्व होर्डिंगचे विशेष ऑडिट करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची प्राथमिक भरपाईही जाहीर केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी घाटकोपर, मुंबई येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आणि होर्डिंग पडून जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.