Jalna News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना कारवाई ; बदलीसाठी चक्क दारूची लाच
•सेवा पुस्तक व पगारपत्रक निल रिपोर्ट पाठवण्यासाठी, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चक्क सिग्निचर दारूची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत 55 हजार रुपय स्वीकारताना रंगेहाथ पकडले
जालना :- परतूर नगरपरिषद येथून बल्लारपूर नगर परिषदेत बदली झाल्यानंतर सेवा पुस्तक व पगार पत्रक पाठवण्याकरिता नील रिपोर्ट देण्यासाठी चक्क अधिकाऱ्यांनी सिग्निचर विदेशी दारू आणि 75 हजार रुपयाचे लाच मागितले होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी सापळा रचून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना 55 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.
अनिल वल्लभदास पारीख (48 वर्ष), प्रभारी स्थानक पर्यवेक्षक तथा फायरमॅन नगरपरिषद परतून, अभिषेक अशोक परदेशी (38 वर्ष), मुख्याधिकारी नगरपरिषद परतून यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली होती. तक्रारदार यांची परतूर नगर परिषद येथून बल्लारपूर नगर परिषद येथे बदली झाली आहे. पारीख याने तक्रारदार यांचे 2023 मधील निलंबन कालावधीतील पगार बिल काढून दिले तसेच तक्रारदार याचे नियुक्तीच्या बल्लारपूर नगर परिषद येथे सेवापुस्तक आणि पगारपत्रक पाठविण्या करिता नगर परिषद परतूर येथील अग्निशमन विभागाचा नील रीपोर्ट देण्यासाठी तक्रारदार याच्याकडे 60 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती 40 हजार स्वीकारण्याचे मान्य करुन सिग्निचर कंपनीची विदेशी दारू बाॅटलची लाच मागणी केली. तसेच नगर परिषद परतूर येथून नगर परिषद बल्लारपूर येथे तक्रारदार याचे सेवा पुस्तक व पगारपत्रक पाठविण्यासाठी नगर परिषद परतूर चे मुख्याधिकारी परदेशी यांचे साठी 15 हजार रुपयाची लाचमागणी करून तक्रारदार यांचे कडून नगर परिषद परतूर येथे दोघांचे मिळून लाचेची रक्कम 55 हजार रुपये स्विकारताना पारीख यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच परदेशी याने पारीख यांना तक्रारदार यांचेकडे त्यांचे सेवा पुस्तक व पगारपत्रक नगर परिषद बल्लारपूर येथे पाठविण्या साठी लाचमागणी करण्यासाठी व लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. दोघांना ताब्यात घेतले असून परतुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा व तपास अधिकारी
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजीनगर ,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक,ए.सी.बी. छत्रपती संभाजी नगर , किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि. जालना. यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर म. मुटेकर ,पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार गजानन कांबळे, गजानन खरात, अतिश तिडके, विठ्ठल कापसे
अॅन्टी करप्शन ब्युरो, जालना यांनी यशस्वी सापळा रचून दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे.