Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane : फिजिक्सवालाने ठाण्यात ऑफलाइन विद्यापीठ सेंटर सुरु केले
ठाणे :- फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) Physics Wallah Vidyapeeth Coaching Center Thane या भारतातील आघाडीच्या एड-टेक व्यासपीठाने ठाणे, मुंबईमध्ये त्यांचे तिसरे तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर लाँच केले आहे, ज्यामधून भारतभरात शैक्षणिक हब्स स्थापित करण्यासह विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याप्रती त्यांची कटिबद्धता दिसून येते. या सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य श्री. रविंद्र फाटक, ठाणे पश्चिमचे माननीय नगरसेवक श्री. एकनाथ भोईर, माजी नगरसेवक श्री. राम रेपाळे आणि फिजिक्सवालाचे सीएचआरओ सतिश खेंगरे उपस्थित होते. Thane Latest News
पीडब्ल्यूच्या ठाणे, मुंबई विद्यापीठ सेंटरमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह १५ तंत्रज्ञान-सक्षम क्लासरूम्स आहेत, जे नीट/जेईई/फाऊंडेशन इच्छुकांसाठी अनुकूल अध्ययन वातावरण देतात. शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ नोंदणीसाठी हे सेंटर या शैक्षणिक वर्षाकरिता नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना २० टक्क्यांची अतिरिक्त सूट देत आहे.
पीडब्ल्यू ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता म्हणाले, “लाँच करण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑफलाइन सेंटरसह आम्ही भारतभरात शैक्षणिक हब्स स्थापित करण्याच्या, तसेच दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाची पूर्तता करण्याच्या जवळ पोहोचत आहोत. हे सेंटर्स देशातील शैक्षणिक लँडस्केपमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सज्ज आहेत.” Thane Latest News
पीडब्ल्यूने संपूर्ण भारतात ७९ तंत्रज्ञान-सक्षम विद्यापीठ सेंटर्स सुरू केले आहेत, तसेच जवळपास दोन वर्षांमध्ये २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना सेवा देत तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑफलाइन नेटवर्कसह झपाट्याने विकसित होणारी एड-टेक कंपनी म्हणून उदयास आली आहे. हे सेंटर्स जेईई/नीट (JEE/NEET) परीक्षांसाठी सर्वसमावेशक अभ्यासक्रम देतात.
पीडब्ल्यू ऑफलाइन विद्यापीठ सेंटर्स रेकॉर्ड केलेल्या लेक्चर्सची सुविधा, एनसीईआरटी मटेरिअल्ससह साह्य, ऑफलाइन शंकांचे निरसन, डेअली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स (डीपीपी) सह व्हिडिओ सोल्यूशन्स, विशेषीकृत मॉड्यूल्स आणि प्रीव्हीयस इअर क्वेश्चन्स (पीवायक्यू) देतात. या सेंटर्समध्ये स्टुडण्ट सक्सेस टीम (एसएसटी) साठी समर्पित डेस्क देखील आहे, ज्यामुळे पीडब्ल्यू विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांसाठी जलद व वैयक्तिकृत रिसोल्यूशन्स देणारे एकमेव व्यासपीठ आहे. तसेच पॅरेण्ट-टीचर डॅशबोर्ड सिस्टम देखील आहे, जी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत रिअल-टाइम अपडेट्स देते. Thane Latest News