Pune PDCC Bank News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
Election Commission Take Action Against PDCC Bank : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने, बँकेच्या विरोधात तक्रार दाखल, बँक मध्यरात्री चालू असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तक्रारीमध्ये पुरावा
पुणे :- बारामती लोकसभेच्या Baramati Lok Sabha Election मतदानाच्या पूर्व मध्यरात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालू असल्याबाबत तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने Sharad Pawar Faction केली होती त्यांनी तक्रारीमध्ये बँक चालू असल्याचे पुरावे फोटोज आणि सीसीटीव्ही चे फोटोज असे पुरावे निवडणूक आयोग आणि पोलिसांना तक्रारीमध्ये दिले होते. या घटनेनंतर निवडणूक आयोग Election Commission यांच्याकडून संबंधित बँकेच्या Pune Bank व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली असून नेमकं त्या दिवशी काय घडले हे स्पष्टीकरण व्यवस्थापकाकडून मागितले आहे. Pune PDCC Bank News
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे निवडणूक यंत्रणेकडे Election Commission तक्रार करण्यात आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे येथील शाखा रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीनेच सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे, तर निवडणूक यंत्रणांकडून करण्यात आलेल्या तपासणीत ऐन 12 वाजता बँकेत 40-50 व्यक्तींकडून संशयास्पद हालचाली होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेत सुरु असणाऱ्या हालचाली, बँकेचे शाखा व्यवस्थापक विनायक तेलावडे यांनी भरारी पथकाला बँकेतील सिसिटीव्ही फुटेज देण्यास केलेली टाळाटाळ, व्यवस्थापकांकडून संपर्क क्रमांक बंद ठेवणे यावरून सगळं काही स्पष्ट झालं आहे. Pune PDCC Bank News
मतदानाच्या काही तास अगोदर अशाप्रकारे कृत्य घडणं हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही तर थेट हत्याच आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी या सर्व यंत्रणांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वेल्हे शाखा व्यवस्थापक विनायक तेलावडे यांच्यावर कारवाई करावीच. परंतु त्याचसोबत बँक सुरु ठेवण्याचे आदेश नेमके कुणी दिले ? बँकेच्या आत नेमके काय सुरु होते ? याचाही सखोल तपास करून संबंधितांवर तातडीने सक्त कारवाई करावी असे मागणी केली होती त्यावर आता कारवाई करण्यात आली असून लवकरच या सर्व प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. Pune PDCC Bank News