विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; हरवलेल्या मोबाईल फोनचा तपास करुन, मोबाईल फोन नागरिकांना परत
Virar Police News : 2 लाख 81 हजार 300 रुपये किंमतीचे 19 मोबाईल, विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी, वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्रातील वेगळा जिल्ह्यातून हरवलेल्या मोबाईल शोधण्यात यश
विरार :- पोलीस ठाणे (Virar Police station ) हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग (Phone Missing) गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठांनी (हरविलेल्या) मिसिंगझालेल्या मोबाईल फोनचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विरार पोलीस ठाणेच्या हरवलेल्या मिसींग मोबाईलचा तपास हाती घेतला होता. Virar Police News
विरार पोलीस ठाणे दाखल हरविलेल्या मोबाईल फोनचे बुध्दी कौशल्याने व तांत्रीक माहितीचे आधारे विश्लेषण करुन वेगवेगळ्या राज्यांमधुन तसेच महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयामधुन एकुण 2 लाख 81 हजार 300 रु. किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण- 19 मोबाईल फोनचा शोध घेऊन ते प्राप्त करण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असून, मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत. Virar Police News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 3, बजरंग देसाई, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे, सुशिलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, पोलीस अंमलदार संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव व प्रफुल सोनार तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, विरार यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार नामदेव ढोणे व पोलीस अंमलदार सोहेल शेख यांनी केलेली आहे.