Mumbai Crime News : अंमली पदार्थ मुक्त मोहिम ; अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 48 तासात 20 जणांवर कारवाई

Mumbai Crime News एप्रिल महिन्यात पोलिसांनी 360 अमली पदार्थ तस्करी विक्री खरेदी विरोधात गुन्हे दाखल केले आहे
मुंबई :- अंमली पदार्थ मुक्त शहर या उद्देशाने शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कार्यवाही करण्याकरीता पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मुंबई शहरातील सर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, 13 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त तसेच सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार हे एकत्रित सर्व मुंबई शहरात कार्यवाही करीत आहेत.
मोहिमेअंतर्गत एप्रिल 2024 अखेर अंमली पदार्थ बाळगल्या बाबत एकुण 360 गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच मागील 48 तासांमध्ये मानखुर्द, दहिसर व खेरवाडी पोलीस ठाणे येथे एम.डी हा अंमलीपदार्थ आणि एल.टी. मार्ग, नागपाडा, पायधूनी, आग्रीपाडा, भायखळा, वहाळा, खेरवाडी, वाकोला, निर्मलनगर, सहार, ओशिवरा, एमआयडीसी, मालाड, कुरार व कस्तुरबा मार्ग दिंडोशी या पोलीस ठाणे येथे गांजा हा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व व्यापार प्रतिबंध करून अंमली पदार्थ मुक्त मोहिम राबविली आहे.
मोहिमेअंतर्गत मागील 48 तासात अंमली पदार्थ कायद्यान्वये खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण 666 आरोपींचा पोलिसांनी तपास घेतला असून 20 आरोपींवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये तीन आरोपीवर एमडी अमली पदार्थ संदर्भात कारवाई करण्यात आली असून 17 आरोपींवर बेकायदेशीररित्या गांजा बाळगणे प्रकरणे कारवाई करण्यात आली आहे.