Jalna ACB Trap News : लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना यांची कारवाई ; महिला तलाठी अधिकारी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
- Jalna ACB Trap News : सजा चांदई तलाठी कल्पना पंजाबराव काळमेघ 12 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
जालना :- भोकरदन तालुक्यातील चांदई गावाच्या तलाठी कल्पना पंजाबराव काळमेघ यांनी 12 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. वडिलांच्या नावाची जमीन आईच्या नावावर करण्याकरिता तलाठी काळमघे यांनी मागितली होती 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. Jalna ACB Trap News
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे चांदई एक्को शिवारात गट नंबर 215 मध्ये 1 हेक्टर 50 आर जमीन असुन ती वाटणी पत्रानुसार त्यांची आई व स्वत:च्या नावावर करण्यासाठी यातील आलोसे काळमेघ तलाठी सजा चांदई एक्को यांनी आज लाच पडताळणी कारवाई दरम्यान दिनांक (25 एप्रिल) रोजी पंचासमक्ष 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडांती 12 हजार रू.घेण्याचे मान्य केले.आज (25 एप्रिल)रोजी सापळा कारवाई दरम्यान राजुर येथे पंचासमक्ष 12 हजार लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून आलोसे काळमेघ यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन हसनाबाद, ज़िल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Jalna ACB Trap News
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर ,किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना,सुजित बडे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना,पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे
अँटी करप्शन ब्युरो ,जालना.