Pankaja Munde : बीडमधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे किती श्रीमंत? एवढी संपत्ती पाच वर्षांत वाढली
•बीडमधून भाजपच्या उमेदवार Pankaja Munde यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंडे किती श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडे किती सोने आहे हे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
बीड :- भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल होताच निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे.
Pankaja Munde यांनी त्यांच्याकडे एकूण 46 कोटी 11 लाख रुपयांची संपत्ती असल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. विशेषत: पंकजा मुंडे आणि त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्या संयुक्त कर्जातही 9 कोटी 94 लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख आणि यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.
Pankaja Munde आणि त्यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांची एकूण संपत्ती 1,000 कोटी रुपयांची असल्याचे जाहीर केले आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी दाखल करताना जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंकजा मुंडे यांच्याकडे 6 कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची जंगम मालमत्ता असून त्यात विविध बँकांच्या ठेवी, विविध कंपन्यांचे रोखे आणि बँकांचे शेअर्स आणि सोन्याचा समावेश आहे.
Pankaja Munde यांच्याकडे 32 लाख 85 हजार रुपये किमतीचे 450 ग्रॅम सोने आणि 3 लाख 28 हजार रुपये किमतीचे 4 किलो चांदी आहे. दोन लाख तीस हजार किमतीचे इतर दागिनेही आहेत. पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे १३ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोने आणि १ लाख ३८ हजार रुपये किमतीचे २ किलो चांदी आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख आणि यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.
पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. बीडमधून पंकजा मुंडे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याशी होणार आहे.