आर्थिकक्राईम न्यूजमुंबई

Maharashtra Government Fraud : मंत्रालयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातून धक्कादायक प्रकार उघडकीस,धनादेशावर विभागाच्या उपसचिव सुनील हांजे यांची बनावट सही

Maharashtra school education and sports Fraud News : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालयातील बँक खात्यातून 47 लाख 60 हजार, चोरट्याने लंपास

मुंबई :- राज्याच्या शालेय शिक्षण Maharashtra school Education व क्रीडा Sports विभागाच्या मंत्रालयातील बँक खात्यातून ४७ लाख ६० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास Money Stolen केल्याची घटना उघडकीस आली आहे. धनादेशावर या विभागाचे उपसचिव सुनील हांजे Fake Sunil Hanje Sign यांची बनावट सही करून हे पैसे काढण्यात आले. चेन्नई, पश्चिम बंगालमधील बँक खात्यावर ही रक्कम लंपास झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यावरून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या चार खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांत त्या राज्यात तपासासाठी पथक पाठवले जाणार आहे.

शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून आरोपींनी आधी बनावट चेक व बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून रक्कम वळती केली. नंतर काही क्षणांतच ही रक्कम दुसऱ्या, त्यानंतर तिसऱ्या अशा अनेक खात्यांत पुढे वळती केली. त्यामुळे नेमके आरोपी कोण आहे हे पोलिसांना कळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिसांना आता या व्यवहाराशी संबंधित परराज्यातील अनेक बँक खात्यांची माहिती गोळा करून तपास करावा लागणार आहे. Maharashtra Government Fraud

याआधी पर्यटन महासंचालनालयाच्या खात्यातून कोलकाता, झारखंड येथील भामट्यांनी बनावट चेकचा वापर करून 68 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. या आरोपींचा तपास सुरू असतानाच 2 मार्च रोजी शिक्षण खात्याच्या अकाउंटवर डल्ला मारल्याचे आता समोर आले आहे. ही रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झीनत खातून यांच्या चेन्नई, पश्चिम बंगालमधील खात्यावर जमा झाल्याचे दिसत आहे. मात्र, त्यानंतर तो पैसा कुणाच्या खात्यात गेला, हे चौघे कोण आहेत, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे दोन्ही प्रकरणांत आरोपींची मोडस आपरेंडी सारखीच असल्याने दोन्ही प्रकरणांचा एकाच वेळी तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा प्रकार शिक्षण नव्हे क्रीडा विभागाच्या खात्यात झाला आहे. Maharashtra Government Fraud News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0