CM Eknath Shinde : त्यांचे वय किती, त्यांच्या कामाचा अनुभव किती, त्यांचे पक्षासाठी योगदान किती….
•शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नक्कल करत आरोप केले
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्यावर आरोप करत पैशाचे गोडाऊन बाहेर काढू का भाजपात येतो असे सांगून गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नक्कल केली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.आज जे काही आरोप होताहेत त्याबाबत बोलायचे तर सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरभैर झाले आहेत. वेडेपिसे झाले आहेत. त्यामुळे त्यांचे संतुलनपण बिघडलेले आहे. बाकी पोराटोरांवर मी बोलत नाही. त्यांचे वय किती, त्यांच्या कामाचा अनुभव किती, त्यांचे पक्षासाठी योगदान किती, आज त्यांच्या वयापेक्षा जास्त काम केलेल्या लोकांकडून पाया पडून घेणे हे लोकांना आवडत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
एकनाथ शिंदे CM Eknath Shinde पुढे बोलताना म्हणाले की, हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले, हे दुर्दैव आहे. मला त्यावर काही जास्त बोलायचे नाही आहे. महाराष्ट्राची आपली एक राजकीय संस्कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्र सर्वांनी पाहिला आहे. पण सध्या जे काही खालच्या पातळीवरचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कमरेखालचे वार, ह्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत. लोकांना विकासावर बोलणे हवे आहे, असे शिंदेंनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे CM Eknath Shinde म्हणाले की, लंडनच्या विश्रांतीचा उच्चार केल्यावर एवढे अस्वस्थ होण्याचे कारण काय होते. लंडनमधील प्रॉपर्टी कुणाच्या आहेत, याची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहेत, पण आम्ही एक मर्यादा पाळतो. राजकारणामध्ये राजकीय गणिते असतात, आरोप प्रत्यारोप असतात. मात्र वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणे हे बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे यांनी आम्हाला शिकवलेले नाही. आरोप प्रत्यारोपच्या मालिकेत यंदाची निवडणूक ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे.