Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर भाजपाच्या वाटेवर ?, दक्षिण मुंबईतून उमेदवारी देणार ?
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि अत्यंत जवळच्या सहकारी फोडण्याची भाजपाची रणनीती
मुंबई :- मिलिंद नार्वेकर Milind Narvekar हे उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहाय्यक आहेत. नार्वेकर हे शिंदे गटात किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, ठाकरे गट पूर्णपणे पोखरून काढण्यासाठी नार्वेकर हे अत्यंत जालीम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. Milind Narvekar News
उद्धव ठाकरेंच्या पडत्या काळात मिलिंद नार्वेकर यांनी प्रचंड साथ दिली आहे. शिवाय शिवसेना आणि ठाकरे कुटुंबातील इंत्थभूत माहिती नार्वेकरांकडे असते. त्यामुळे, नार्वेकरांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यास उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वांत मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकरांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.a
मुंबई दक्षिणतून उमेदवारी मिळण्याची शक्यता ?
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यास उत्सुक आहे. तसेच मिलिंद नार्वेकर महायुतीत आल्यास त्यांचेही नाव या शर्यतीत घेतले जात आहे. असे झाले तर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या पक्षबदलाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मिलिंद नार्वेकरांच्या शिंदे गट प्रवेशाचे वृत्त त्यांनी या माध्यमातून फेटाळले. तसेच नार्वेकर यांच्याशी संपर्कही नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नालाच बगल देण्याचा प्रयत्न केला होता. Milind Narvekar News