PM Narendra Modi In Maharashtra : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
•मी सर्वांची माफी मागतो… पंतप्रधान नरेंद्र मोदी
नांदेड :- नांदेड आणि परभणीमध्ये सभा झाल्या. नांदेडमधील सभेत मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. तर परभणीमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी सभेतील भाषणांत मोदींनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आहेत. PM Narendra Modi In Maharashtra
मोदी परभणीत झालेल्या सभेत मराठीतून मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, “परभणीच्या धर्तीवर साईबाबांचे पवित्र चरण लाभले. सभेला झालेल्या गर्दीवरून हे दिसून येते की सभेची जागा अपुरी पडली. अनेक लोक उन्हात उभे आहेत. त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो. मात्र जे उन्हात उभे आहेत त्यांची तपस्या मी वाया जाऊ देणार नाही. तुमच्या या प्रेमाला मी विकासाच्या रूपाने परत करेल” असे मोदी म्हणाले. PM Narendra Modi In Maharashtra
यंदाच्या निवडणुकीचे उद्दिष्ट हे भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे आहे. त्यामुळे 2024 चे निवडणुकीचे मुद्दे हे सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. प्रत्येक पाऊल, संकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ही निवडणूक आहे” असे मोदी म्हणाले. PM Narendra Modi In Maharashtra
मोदी पुढे म्हणाले, “2014 पूर्वी दहशतवादसारख्या मुद्द्यांवर चर्चा व्हायची. मात्र पाच वर्षांत परिस्थिती अशी बदलली की आता सर्जिकल स्ट्राईकची चर्चा होते. सब का साथ, सबका विकासच्या आधारे हे सरकार काम करते. आता बाहेर मोदी घर में घुसके मारता हैं अशी भीती आहे”, असे मोदी म्हणाले. PM Narendra Modi In Maharashtra
“काल देशात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचे मी आभार मानतो असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी देशातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्याची भावना ही प्रत्यक्ष नागरिकांमध्ये असायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे” असे आवाहन करत मोदींनी नांदेडमध्ये भाषणाला सुरुवात केली. PM Narendra Modi In Maharashtra
महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख येणाऱ्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार आणि माझे लहान भाऊ महादेव जानकर यांना तुम्हाला विजयी करायचे आहे असे म्हणत मोदींनी परभणीकरांना आवाहन केले. तसेच घरोघरी मोदींचा नमस्कार पोहोचवा त्यामुळे मला आशीर्वाद मिळतील. हेच आशीर्वाद मला देशासाठी दिवसंरात्र काम करण्यासाठी प्रेरणा देतात” असे म्हणत मोदींनी आपले भाषण संपवले. PM Narendra Modi In Maharashtra