Google’s Doodle Pays Tribute : गुगलकडून खास डुडल
•देशात पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गुगलकडून खास डुडल
मुंबई :- नागरिकांना मतदानाबाबतील जागृक करणे या करिता गुगल कडून मतदानाच्या पहिल्या दिवशी खास डुडल Google’s Doodle Pays Tribute .भारतात आजपासून लोकसभा निवडणूकीला सुरुवात होत आहे. देशात पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान होत आहे. अश्यातच गुगलने होमपेजवर डूडलसह लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात सामील झाला आहे. गुगल प्रत्येक सणासुदीच्या आणि महत्त्वाच्या दिवशी डूडल तयार करत असतं. आज देखील खास गुगल डूडल तयार केले आहे. निवडणूकीच्या निमित्ताने गुगलने O या अक्षरावर मतदानाच्या हाताची प्रतिमा आणि बोटावर शाईचे चिन्ह असलेले प्रतिमा बनवली आहे. याचा खास उद्देश असा की, मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत सुरु राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी (17 एप्रिल) संध्याकाळी संपला. Google’s Doodle Pays Tribute या टप्प्यासाठी आज म्हणजेच 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघांसह 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान होणार आहे.