Rohit Pawar : अजितदादा यांना मुंबई – दिल्लीवरून भाषणं येतात ; आमदार रोहित पवार
Rohit Pawar Target Ajit Pawar : अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावरून चारही बाजूने टीका रोहित पवार यांच्याकडून टीकास्त्र
पुणे :- रोहित पवार Rohit Pawar यांनी अजित पवारांनी Ajit Pawar केलेल्या द्रौपदीबाबतच्या विधानावर देखील टीका केली आहे. “भाषणात द्रौपदीचे उदाहरण द्यायचे काय कारण होते? यामुळे महिलांचा अवमान झाला. दादा आता जेवढे भाषण करतील त्यांचा भाषणावरील तोल सुटत जाईल. कारण मुंबई – दिल्लीवरून त्यांना भाषणं येतात, ते भाषण दादा वाचतात. वाचण्याच्या नादात दादांची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे असा प्रयत्न भाजपकडून केला जातो”, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. Rohit Pawar Target Ajit Pawar
तसेच “आता राजकीय दृष्टीकोनातून कुटुंब पाहिले तर जो विचार आम्ही सर्वांनी जपला त्या विचाराविरोधात अजितदादा गेले. तसं राजकीय दृष्टीकोनातून ते बाहेरचे झाले आहेत. शरद पवारांबरोबर जे राहिलेले ते खरे विचारांचे वारसदार आहेत. मात्र अजित पवारांनी हे प्रकरण वेगळ्या पातळीवर नेले”, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
पवारांबरोबर राहिलेले खरे विचारांचे वारसदार आहे.अजितदादा यापुढे जेवढी भाषणे करतील तेव्हा त्यांचा भाषणावरील तोल सुटत जाईल असा टोला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. तसेच अजित पवारांची राजकीय ताकद कमी करण्याचा भाजपचा डाव आहे असेही रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar Target Ajit Pawar
दादा तीस वर्षे भाजपच्या विरोधात लढले आज वृत्तवाहिनीशी बोलतांना रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांचा विचार अजित पवारांना कधीच समजला आहि असे रोहित पवार म्हणाले. ते म्हणाले “दादांना शरद पवारांचा विचारच समजला नाही. पवार कुटुंबीयाने नेहमी पुरोगामी विचार मनामध्ये ठेवला आहे. शरद पवार गेली साठ वर्षे प्रतिगामी विचारांविरोधात लढत आहेत. अजित दादा स्वतः तीस वर्षे भाजपच्या विचारा विरोधात लढत होते”, असे रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar Target Ajit Pawar