Death Threat : एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गॅंगकडून धमकीचा फोन

Eknath Khadse Death Threat Call : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गॅंग कडून धमकीचा फोन, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जळगाव :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करत असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या धमकीचे गांभीर्य पाहून या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanavis यांनी लक्ष घालावे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. Eknath Khadse Death Threat Call
एकिकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी व्यस्त आहेत. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून हे धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. चार वेगवेगळ्या फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वतीने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अशा प्रकारचे धमकीचे फोन आल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे. Eknath Khadse Death Threat Call
एकनाथ खडसे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये घर वापसी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांना मिळालेल्या धमकीमुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. रक्षा खडसे यांचा प्रचार करता यावा यासाठी एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवेश पक्षप्रवेश हा दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र अद्याप यासंबंधीची अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा कधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता लागली आहे. Eknath Khadse Death Threat Call