Nallasopara Crime News : बांग्लादेशी नागरीक अटक ; नालासोपारा पोलिसांना यश
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांना यश ; नालासोपारा प्रगती नगर शिवसम्राट बिल्डींग येथे एक महीला व एक पुरुष बांग्लादेशी नागरीक यांचेवर कारवाई करुन आरोपी यांना अटक करण्यात आले
नालासोपारा :-बेकायदेशीर रित्या बांगलादेशी लोक राहत असल्याचे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या नुसार तुळींज पोलीस ठाण्याचे हद्दीत शिवसम्राट बिल्डींग, प्रगती नगर नालासोपारा पूर्व याठिकाणी परकीय नागरीक अनधिकृत पणे भारतात राहत असल्याची गोपनीय माहिती अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांना मिळाली असता सदर वेळी दोन लायक पंच यांना कार्यालयात बोलावून घेवून सदर परकीय नागरीकांवर प्रगती नगर येथे जावून कारवाई करण्याच्या सुचना देवून सदर बातमीची खातरजमा करुन पंच व पोलीस पथक असे जावून 15 एप्रिल रोजी कारवाई करुन शिवसम्राट बिल्डींग, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व येथील अनधिकृतपणे राहत असलेले बांग्लादेशी नागरीक एक महीला व एक पुरुष घांना अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास यश आलेले आहे. Nallasopara Crime News
थोडक्यात हकीकत अशी कि, शिवसम्राट बिल्डींग नं.०२, प्रगती नगर नालासोपारा पूर्व ता. वसई जि.पालघर परीसरामध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करीत असलेले परदेशी नागरीक यांच्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे शिवसम्राट बिल्डींग च्या गेट च्या बाहेर जावून तेथे संशयीत एक महीला व एक पुरुष मिळून आल्याने त्यांना पोलीसांनी त्यांची ओळख करुन देवून सदर पुरुष व महीलेस त्यांचा नाव, पत्ता व भारतीय नागरीकत्वाची कागदपत्रे विचारले असता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) आकाश आरीफ खान (26 वर्षे) नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर, मुळ देश बांग्लादेश (पूर्ण पत्ता माहीत नाही) , तसेच महीला नामे 2) लाबोनी पोरीधीन मंडल (22 वर्षे) नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर, मूळ देश बांग्लादेश (पूर्ण पत्ता माहीत नाही) असे सांगितले असून त्यांचेकडे त्यांचे भारतात येण्याकरीता व्हिझा पासपोर्ट नसून ते अनधिकृत पणे भारतात प्रवेश करुन येवून अवैधरित्या वास्तव करीत असल्याने सदर महीला व पुरुष बांग्लादेशी आरोपी यांचेवर तुळींज पोलीस ठाणे भारतीय पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3 (अ), 6 (अ), सह विदेशी अधिनियम 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nallasopara Crime News
पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे Avinash Ambure (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) बल्लाल यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी चाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा यूनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार पवार, पोलीस हवालदार किणी, किणी, महिला पोलीस हवालदार डोईफोडे, महिला पोलीस हवालदार तिवले पोलीस हवालदार पागी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा विभाग यांनी केली आहे Nallasopara Crime News