भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ; जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad Criticized BJP Poster : भाजप यांच्या जाहीरनाम्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका
मुंबई :- काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गाधी यांची मोजून केवळ चार छायाचित्रे आहेत. तर भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा PM Modi photo फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटलंय. मग दहा वर्ष काय केलं?
तुम्ही जाहीरनामे बारकाईने वाचलेत तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. इथे तुमच्या सोयीसाठी आणखी एक छोटीशी तुलना करून सांगतो. या जाहीरनाम्यांमधील तरूणांचा विभाग पाहिला तर असं दिसतं की भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांना फक्त पैसे खर्च करायचे आहेत. ते कसे आणि कुठे खर्च करायचेत याचा कोणताही मुद्देसूद उल्लेख नाही. परंतु काँग्रेसचा जाहीरनामा हा बेरोजगारीचं वास्तव मांडून त्यावर उपाय सुचवणारा, आर्थिक हिशेब देणारा धारणात्मक आणि महत्त्वाकांक्षी आहे.
तुम्हाला ठरवायचे आहे की विकासाच्या नावाने स्वत:च्या तिजो-या भरणा-या भाजपला मत द्यायचे की लोकाभिमुख योजना राबवणा-या ‘इंडिया’ आघाडीला.
भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटलंय. मग दहा वर्ष काय केलं? असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्याची तुलना करत भाजपवर टीका केली आहे.
प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गाधी यांची मोजून केवळ चार छायाचित्रे आहेत. तर भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटलंय. मग दहा वर्ष काय केलं?” असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.