Mira Road Crime News : मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश ; कर्नाटक राज्यातुन फसवुणक करुन अपहार केलेला करोडो रुपये किमंतीचा काजु हस्तगत
Mira Road Crime News : काजूचा ट्रक लंपास, कर्नाटकचा काजू नवी मुंबईत नालासोपाऱ्यात पोलिसांकडून कारवाई
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून कारवाईला यश आले आहे.फिर्यादी नामे मोहनदास विठ्ठल शेट्टी यांचा उडपी राज्य कर्नाटक येथे रॉ मटेरीयल घेवुन काजु तयार करण्याची श्रीकृष्ण नांवाची फॅक्टरी, मोडूगुडे, शिरुरु, उडपी, कर्नाटक येथे आहे. (02 एप्रिल)रोजी मिळालेल्या ऑर्डर नुसार 24.63 मेट्रीक टन एकूण किमंत 1 कोटी 21 लाख 76 हजार 598 रुपये किमंतीचा काजु असा माल उडपी, कर्नाटक येथून सुरत व अहमदाबाद राज्य गुजरात येथे 2469 बॉक्समध्ये भरुन मधुन भरुन पाठविण्यात आलेला होता. परंतु माल सुरत व अहमदाबाद राज्य गुजरात येथे न पोहचल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन ब्रम्हावर पोलीस ठाणे जि.उडपी, कर्नाटक भादविसक 406,420,34 प्रमाणे 03 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल आहे. Mira Road Crime News
गुन्हा दाखल झाले बाबत बातमीदारामार्फत माहीती प्राप्त झाल्याने लागलीच ब्रम्हावर पोलीस ठाणे जि. उडपी, कर्नाटक येथील पोलीस पथकास संपर्क साधुन दाखल गुन्हयाबाबत अधिक माहीती घेण्यात आली. सदर माहीतीचे आधारे तांत्रीक विश्लेषण तसेच बातमीदाराकडुन आरोपी यांनी अपहार केलेला मुद्देमाल नालासोपारा येथे एका व्यापाराकडे लपवुन ठेवला असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली. त्याअनुषगांने नालासोपारा तसेच वाशी, नवी मुंबई येथुन 10 किलो ग्रॅम वजनाचे 1854 बॉक्स असा एकुण 92 लाख 70 हजार रुपये किमंतीचा काजु मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण कक्षाकडुन हस्तगत करण्यात आला आहे. Mira Road Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेथे, पोलीस हवालदार मनोहर तावरे, संग्राम गायकवाड, संतोष मदने, हनुमंत सूर्यवंशी, गोविंद केंद्रे, सतिश जगताप, आसिफ मुल्ला, पोहवा. राजविर संधु, प्रविणराज पवार, पोहवा, अनिल नागरे, पोलीस नाईक नितीन राठोड, पोलीस शिपाई अंगद मुळे, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण,सचिन चौधरी यांनी केली आहे. Mira Road Crime News