Ulhasnagar Crime News : अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या आरोपीला केले अटक
•आरोपीकडे एक लाख 92 हजार 500 किंमतीचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त
उल्हासनगर :- ललित पाटील प्रकरणानंतर राज्यात अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाईचे पोलिसांनी पावले उचलले आहे. पोलिसांनी आतापर्यंत मोठमोठ्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली असून तसेच मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अशातच पोलिसांनी उल्हासनगर मधील एका अमले पदार्थाचे तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून पोलिसांनी एक लाख 92 हजार किमतीची आम्ही पदार्थ जप्त केले आहे.
11 एप्रिल रोजी रात्रौ 10.25 मध्यवर्ती पोलीस ठाणे चे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पानसरे, पोलीस हवालदार पाटील व त्यांचे पथकाने, उदयोविहार कंपनीच्या कंपाउंडच्या बाजूला, विठ्ठलवाडी स्टेशन रोड, उल्हासनगर-3 येथे सापळा रचुन आरोपी आकाश प्रेम पंजवाणी, (26 वर्षे), (रा.भाटीया चौक, उल्हासनगर-5) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडे एम.डी.पावडर(मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ, एक रेडमी कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम व ॲक्टीव्हा वरून एकुण 1 लाख 92 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगुन वाहतुक असताना मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द गुन्हा एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 22 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. फरारी आरोपीचा शोध घेत आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पानसरे हे करीत आहेत.