Thane Crime News : तो दोन वर्षांसाठी तडीपार होता,तरी तो शहरात वावरत होता, पोलिसांनी आवाळल्या मुसक्या
Thane Crime News Thane CP Ashutosh Dumbare Arrested Tadipar Criminal In Thane : आरोपीला दोन वर्षासाठी चार जिल्हे आणि दोन तालुक्यातून केले होते हद्दपार
उल्हासनगर :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. तडीपार आरोपींना Tadipar Criminal शहरातून हद्दी पार केले असले तरी सर्रास पोलिसांचे परवानगी न घेता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वावरत असताना दिसत आहे.अशा तडीपार गुंडास ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. उल्हासनगर पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला उल्हासनगरमधून अटक केली आहे. Thane Crime News
आरोपी विशाल ऊर्फ सोनु अशोक शिंदे (27 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे आणि रायगड जिल्हयातील कर्जत व पनवेल तालुका या महसुली हद्दीतुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 23 ऑगस्ट 2022 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून,11 एप्रिल रोजी रात्री 8.45 वा. चे सुमारास, हनुमान नगर उल्हासनगर-2 येथे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पथकास मिळुन आला.उल्हासनगर पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी विशाल शिंदे, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक पाटील हे करीत आहेत. Thane Crime News