Thane Crime News : ठाण्यात तरुणाकडे हत्यार, कासारवडवली पोलिसांनी बंदूक जप्त

Thane Crime News Kasarwadi Police Arrested Man with Gun : पोलिसांनी तरुणांकडून देशी बनावटीचे पिस्टल (बंदूक), एक जिवंत काडतुस जप्त
ठाणे :- राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्या ठाणे शहर आहे ठाणे शहराकडे राजकीय दृष्ट्या जरी लक्ष असला तरी गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणे गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारताना दिसत असताना ठाण्यातून एका तरुणाकडे बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगल्याप्रमाणे पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली आहे. पोलिसांनी हे आत्याला जप्त केले असून तरुणाच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. Thane Crime News
कासारवडवली पोलीस ठाणेचे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, पोलीस उपनिरीक्षक साळुंके, पोलीस शिपाई नाईक व त्यांचे पथकाने, 10 एप्रिल रोजी रात्रौ 12.45 वा. सुमारास, पिंक बाबा हॉटेलकडे जाणा-या रोडवर, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम येथे आरोपी विकास जगन अडसुळ, (22 वर्षे) रा.घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 1 देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल (अग्नीशस्त्र), 1 जिवंत काडतुस असा मुद्देमाल मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी याला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके हे करीत आहेत. Thane Crime News