Badlapur Crime News : बेकायदेशीर रित्या शस्त्र (बंदूक) बाळगणाऱ्या आरोपीला अटक
•आरोपीकडे देशी रिवॉल्वर, एक जिवंत काडतुस बाळगल्या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपीला केले अटक
बदलापूर :- देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रातही पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे त्यापूर्वी पोलिसांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेता शहरातील बेकायदेशीर धंदे, बेकायदेशीर दारूचे अड्डे, पैशाची हेरगिरी करणारे, आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. बदलापूर पोलिसांनी अशाच एका आरोपीला अटक केली आहे आरोपीकडे एक रिवाल्वर एक जिवंत काडतुस आढळून आले आहे.
बदलापुर पश्चिम पोलीस ठाणेच्या पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंबे, पोलीस नाईक खडके व त्यांचे पथकाने, 8 एप्रिल रोजी रात्रौ 8.15 वा.चे सुमारास, उल्हास नदीचे ब्रिजखाली, बदलापुर पश्चिम येथे आरोपी मोबीन सलीम शेख उर्फ बटा, (31 वर्षे), (रा.बदलापूर पश्चिम) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 1 देशी बनावटीचे लोखंडी रिवाॅल्वर (अग्नीशस्त्र), 1 जिवंत काडतुस, रेडमी कंपनीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंबे हे करीत आहेत.