मुंबई

Ramtek Lok Sabha : विद्यमान खासदार रामटेक लोकसभेचे कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले, तुमाने यांची भाजपावर टीका

Ramtek Lok Sabha : शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे यांची समोर ओव्याचा शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यथा व्यक्त केली

मुंबई :- रविवारी (7 एप्रिल) देशपांडे सभागृहात शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तुमाने यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.मुख्यमंत्री शिंदे साहेबांवर दबाव होता. त्यामुळेच मी मागे हटलो असे विधान शिंदेसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापले गेल्याने दुखावलेल्या कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमोरच आपली व्यथा बोलून दाखवली आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले, “सर्व काही घडत असतांना मी पाहत होतो. साहेब माझ्यासाठी शेवटपर्यंत लढत होते. मात्र, त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे मी मागे हटलो. पक्षासाठी काम करा असे साहेब म्हणाले. मनात दुःख होते, पण मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहीन, असा शब्द साहेबांना दिला”, असे म्हणत तुमाने यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
पुढे त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. लोक आमच्या सोबत राहतात. मजबूत होतात व नंतर आमच्याच लोकांना घेऊन पळतात. त्यामुळे आमचा पक्ष डाऊन होतो. साहेबांच्या मनात काय होते, हे मला माहीत आहे असे तुमाने म्हणाले. दरम्यान, या मेळाव्यात तुमाने दाखल होताच्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर तुमाने भाषण देण्यासाठी उठले तेव्हा पुन्हा एकदा सभागृहात घोषणांचा आवाज दुमदुमला.

एक लाखांहून अधिक मतांनी निवडून आलो असतो तुमाने म्हणाले की, “माझ्याकडे लोकं, संघटना नाहीत असे साहेबांना सांगण्यात आले होते. मात्र मागील लोकसभा निवडणूक मी याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकली होती. मी घरात बसल्याचे देखील शिंदेंना सांगण्यात आले. पण, काँग्रेसचे केंद्रीय नेते असलेल्या मुकुल वासनिक यांचा पराभव करून मी निवडून आलो होतो. यावेळी तर स्पर्धाच नव्हती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मी एक लाखांहून अधिक मतांनी निवडून आलो असतो”, असे म्हणत कृपाल तुमाने यांनी भाजपवर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0