Pune Tadipar News : युनिट-05, गुन्हे शाखेचे कामगिरी; लोखंडी कोयत्यासह तडीपार गुंडास केले जेरबंद
तडीपार आरोपीला केले अटक, आरोपीकडे धारदार शस्त्र
पुणे :- 16 मार्च रोजीपासून संपुर्ण पुणे शहरामध्ये लोकसभा निवडणुक 2024 Loksabha Election 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये विविध प्रकारे कायदा व सुव्यवस्था कायम राखविण्याबाबत अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे यांनी सूचना दिलेल्या आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट-5 व्या कार्यक्षेत्रामध्ये लोकरामा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारांकडून कोणतेही अनुचित प्रकार घड्डु नये यासाठी युनिट-5, चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिटकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळ्या टिम तयार करुन त्यांना योग्य ती कारवाई करणेसाठी सुचना निर्गमित केलेल्या होत्या.
3 एप्रिल 2024 रोजी युनिटकडील पोलीस अंमलदार अकबर शेख यांना बातमी मिळाली की, पुणे शहर व पुणे जिल्हयातुन तडीपार केलेला गुंड आदित्य उर्फ दाद्या शिंदे याचेकडे धारदार शस्त्र असुन तो कोणतातरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने माळवाडी, हडपसर या परिसरात वावरत आहे. वगैरे माहिती मिळाली, त्याप्रमाणे तडीपार आरोपी नामे आदित्य उर्फ दाद्या बबन शिंदे, (24 वर्षे), (रा. कामठेवस्ती, माळवाडी हडपसर, पुणे) यास पकडण्यासाठी शिस्तबध्द नियोजन केले. योग्य त्या पध्दतीने सापळा लाऊन त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याचे कब्जात एक धारदार तलवार ही स्वतःची दहशत निर्माण करणेकानी वापरत असल्याचे आढळून आले. म्हणून त्याचेविरुच्द भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135 आणि 142 प्रमाणे कारवाई केली. नमुद आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यास पुणे शहर व पुणे जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार केले आहे. नमुद तड़ीपार आरोपीविरुन्द हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास चालु आहे. तडीपार आरोपी आदित्य उर्फ दाद्या बबन शिंदे याचेविरुध्द 20 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.
पोलीस उपायुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस अंमलदार विनोद शिवले, दया शेगर, शशिकांत नाळे, दाऊद सय्यद, पांडुरंग कांबळे, राहुल ढमढेरे यांनी केलेली आहे.