Big Breaking News : व्यवसायिकाला रस्त्यात अडवून पोलीस निरीक्षकांनी मागितले तब्बल दोन कोटी
Thane Police News Thane Police Inspector Nitin Vijaykar Arrested In Bribe Case : ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक नितीन विजयकर याने व्यवसायिकाला लुटले
नवी मुंबई :- पाम बीचवर भर दिवसा अडवून एका व्यावसायिकाकडून तब्बल 2 कोटी रुपये 2 crore Bribe उकळण्यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन भिकाजी विजयकर Thane Police Inspector Nitin Vijaykar यांना त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आले आहे. खाकी वर्दीनेच केलेल्या लूटमारीच्या या घटनेने मुंबई-नवी मुंबई आणि ठाण्याच्याही पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. Mumbai Crime News
हा भयंकर प्रकार तसा 29 मार्च रोजी घडला. पोलीस निरीक्षक नितीन भिकाजी विजयकर याच्या अटकेनंतर या खाकी Maharashtra Police वर्दीतील लूटमारीला तोंड फुटले.घाटकोपर येथील विद्याविहार पाइपलाइन रोडवर राहणारे राजेश काटरा यांचे तुर्भे एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोअरेज आहे. शुक्रवारी ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना मुंबई विमानतळावर सोडून दुपारी नवी मुंबईच्या दिशेने निघाले. दोनच्या सुमारास त्यांची कार सायन-पनवेल मार्गावरील वाशी उड्डाणपुलावरून पामबीचवर जाण्यासाठी सर्व्हिस रोडवर येताच लुटारूंनी आपली कार त्यांच्या कारला आडवी लावली. त्यांच्या कारच्या मागेही एक कार उभी करण्यात आली. तुमच्याकडे पैशांचा मोठा साठा आहे. अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. केस झाली तर तुम्ही आणि तुमचे सर्वच कुटुंब यात अडकू शकते, अशी भीती दाखवत पोलीस निरीक्षक विजयकर व त्याच्या पाच साथीदारांनी राजेश यांना दमात घेण्यास सुरुवात केली. व्यवसायिकाला धमकवून घाबरवून हे प्रकरण मिटवण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी त्यांना मागितली. रस्त्यावर ही लूट यशस्वी होणार नव्हती. प्रचंड भयभीत झालेले राजेश काटरा यांनी मग यांना वाशी येथील सेक्टर 29 मधील आपल्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर नेले. तिथे दोन कोटी रुपये देतो. ही प्रचंड मोठी रक्कम या टोळीच्या हवाली केली आणि मगच त्यांची सुटका झाली.दोन कोटी रुपयांची रक्कम घेऊन ही टोळी तिथून निघून जाताच राजेश काटरा यांनी वाशी पोलीस ठाणे गाठले. घडला प्रकार सांगितला. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे, पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी तीन पथक नेमून तपास सुरु केला. खबरी, तांत्रिक तपास, आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे धक्कादायक तपशील हात्ती लागले. या लुटीच्या मागे तोतया पोलीस नसून खरे पोलीस असल्याचे उघड होताच पोलिसांनी नितीन विजयकर याला त्याचे साथीदार मोहन पाडळे, उदय कवळे, विलास मोहिते, नारायण सावंत आणि मोहन पवार यांच्यासह गजाआड केले. विजयकर आणि टोळी हाती लागलीच शिवाय अत्यंत गतीने तपास झाल्याने त्यांनी लुटलेली पूर्ण रक्कमही वसूल झाली. Mumbai Crime News
पोलीस निरीक्षक विजयकर (55) हा भांडुप पश्चिमेला प्रसाद अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्यावर दरोडा, अपहरण, धमकावणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजयकर याने अशा पद्धतीने आणखी किती जणांची लुटमार केली आहे, याचाही पोलीस कसून तपास करीत आहेत. Mumbai Crime News