मुंबईक्राईम न्यूज

Kalyan Crime News : गुन्हे शाखा, घटक -3 कल्याण, कामगिरी ; 24 तासाच्या आतमध्ये खुनाच्या गुन्हयाचा उलगडा

•Kalyan Crime News खुनातील आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक

कल्याण :- (3 एप्रिल) रोजी कोळशेवाडी पोलीस ठाणे हददीत सुचक नाका, कल्याण पुर्व येथे मयत सुरज सोमा हिलम (25 वर्षे) यास 20 ते 25 वर्षे वयाच्या अनोळखी 06 इसमानी लाकडी फळीने, झाडुने, व दगड फेकुन गंभीर जखमी करून जिवे ठार मारले बाबत मयत इसमाचा भाउ नामे पिंटया सोमा हिलम याचे फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि भादविक 302,143,147,149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे घटनास्थळी इकडील घटकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ भेट देवुन नमुद गुन्हयाचा समांतर सुरू करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हयातील आरोपीत निष्पन्न केले. तद्नंतर इकडील घटकातील पोलीस अंमलदार मिथुन राठोड यांना गुप्त बातमीदार कडुन माहिती मिळाली की, प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे 02 संशयीत आरोपीत व 01 विधीसंघर्षित बालक हे सुचक नाका, रिक्षा स्टॅन्ड जवळ कल्याण पुर्व येथे येणार आहेत. बातमीच्या अनुषंगाने इकडील घटकातील पोलीस अधिकरी व अमंलदार यांनी कारवाई करून प्रस्तुत गुन्हयातील संशयीत आरोपी नामे 1) रूपेश महादेव कांबळे (19 वर्षे) रा. महात्मा फुले नगर झोपडपटटी, सुचक नाका, कोळशेवाडी कल्याण पुर्व. 2) मोहन रमेश बनसोडे (18 वर्षे) रा. रा. महात्मा फुले नगर झोपडपटटी, सुचक नाका, कोळशेवाडी कल्याण पुर्व. यांना तसेच 01 विधीसंघर्षित बालक यांना घेवुन युनिट कार्यालयात आले. Kalyan Crime News

Kalyan Crime News

त्यानंतर नमुद संशयीत आरोपीत व विधिसंघर्षित बालक यांचेकडे प्रस्तूत गुन्हयाबाबत अधिक विचारपुस करता ताब्यात असलेला संशयीत इसम नामे मोहन रमेश बनसोडे यांने माहिती दिली की, त्याचे मामा यातील मयत इसम नामे सुरज सोमा हिलम यांने दारू प्यायला बसले असताना उसणे घेतलेले पैसे देणे-घेण्यावरून मारहाण केल्याचा राग मनात धरून वरिल संशयीत आरोपीत नामे 1) रूपेश महादेव कांबळे (19 वर्षे) 2) मोहन रमेश बनसोडे (18 वर्षे) व एक विधीसंघर्षित बालक तसेच त्यांचे अजुन साथीदार पहिजे आरोपीत यांनी मिळून मयत इसम सुरज सोमा हिलम यास लाकडी फळीने, झाडुने, व दगड फेकुन मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले असल्याचे सांगितले. त्यांनतर नमुद संशयीत आरोपीत व विधिसंघर्षित बालक यांचा वर नमुद गुन्हयात सहभाग असल्याची त्यांनी कबुली दिल्याने वर नमुद तिघांना पुढील कारवाई करीता कोळशेवाडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. Kalyan Crime News

गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी 24 तासाच्या आत तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. Kalyan Crime News

पोलीस पथक
पंजाबराव उगले Punjabrao Ugale, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व निलेश सोनावणे सहाय्यक पोलीस आयुक्त, (शोध 1) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, पोलीस हवालदार अनुप कामत, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस नाईक दिपक महाजन, पोलीस नाईक सचिन वानखेडे, पो.कॉ. मिथुन राठोड, पोलीस शिपाई विनोद चन्ने, गुरूनाथ जरग,गोरक्ष शेकडे, रविंद्र लांडगे, अमोल बोरकर यांनी केलेली आहे. Kalyan Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0