मुंबई

Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढवण्याची शक्यता

•Chhagan Bhujbal Maharashtra Sadan Scam मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढवण्याची शक्यता दिसून येत आहे.कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात याचिकाकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर सर्व आरोपींना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, आता छगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्यासह इतर सर्व आरोपींना उच्च न्यायालयाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आली आहे. यासंबंधी चार आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेल्या नोटिसीत देण्यात आले आहेत. छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळ आणि समिर भुजबळ यांचे देखील नावे या प्रकरणात आहेत. त्यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

नेमके प्रकरण काय?

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटाच्या माध्यमातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांच्या नावावर रोख रक्कमेच्या स्वरूपात लाच मिळाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावेळी अंजली दमानिया या आम आदमी पक्षांमध्ये काम करत होत्या. त्यात महाराष्ट्र सदन आणि इंडियाबुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर ईडीच्या वतीने देखील दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीशांनी पुराव्यांकडे दुर्लक्ष करून भुजबळ यांना दिलासा दिला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ठराविक आरोपींची मुक्तता केल्या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.

अंजली दमानिया यांचे ट्विट

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना डिसचार्ज करण्यात आल होतं. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दिड वर्ष ऐकले जात नव्हते. 5 न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयासमोर एक SLP करुन त्यावर ओरडी घेऊन, माननीय CJ ह्यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले. शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक 12 वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.

आज मुंबई हाई कोर्टाच्या जस्टिस मोडक समोर मैटर लिस्टेड होत. भुजबळांना सेशन कोर्टातून मिळालेला डिसचार्ज हा कसा चुकीचा आहे ह्याची माहिती कोर्टाला दिली. कोर्टाने सर्व आरोपींना नोटिस देण्याचे आदेश दिले.

आम्ही कोर्टाला विनंती केली के ह्या नोटिस ACB ने आरोपींना द्याव्यात . कोर्टाने आमची मागणी मंजूर केली . आता ह्या नोटीस 29 तारखे पर्यंत returnable आहेत. दोषींना शिक्षा नक्कीच होणार ह्यात शंका नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0