Navi Mumbai Sex Racket : नवी मुंबईत देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश; दोन अल्पवयीन मुलींची सुटका, दीड लाखात व्हायचा सौदा

Navi Mumbai Latest Sex Racket News : अननैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची मोठी कारवाई | मुख्य आरोपी ‘हरिष’ला बेड्या, एका पित्याविरुद्धही गुन्हा दाखल
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालय क्षेत्रात अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुली पुरवणाऱ्या एका रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, दोन अल्पवयीन मुलींची नराधमांच्या तावडीतून सुटका केली आहे. याप्रकरणी मुख्य दलाल हरिष विकास छारी याला अटक करण्यात आली असून, धक्कादायक म्हणजे स्वतःच्या मुलींना या व्यवसायात ढकलणाऱ्या एका पित्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Navi Mumbai Police Latest News
बनावट ग्राहकामार्फत रचला सापळा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 20 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, हरिष नावाचा एक इसम 16 ते 17 वर्षांच्या मुलींना वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना पुरवतो. या मुली अल्पवयीन असल्याने त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळत नसे, त्यामुळे आरोपी ग्राहकाने ठरवलेल्या जागी मुलींना सोडून येत असे. एका मुलीसाठी चक्क 1 लाख 50 हजार रुपयांचा दर आकारला जात होता.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत हरिषशी संपर्क साधला. त्याला मुलींसह सीबीडी बेलापूर येथील ‘के स्टार’ हॉटेलजवळ बोलावले. ठरल्याप्रमाणे आरोपी तिथे येताच पोलिसांनी कुकरेजा प्लाझा परिसरात छापा टाकून आरोपी हरिष छारी (25 वय) याला रंगेहाथ पकडले.
पित्यानेच मुलींना ढकलले नरकात
या कारवाईत पोलिसांनी 16 आणि 14 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी राज सिंग उर्फ राजा (पूर्ण नाव पत्ता अज्ञात) याने स्वतःच्या अल्पवयीन मुलींची ओळख आरोपी हरिषशी करून दिली होती. आर्थिक फायद्यासाठी आपल्याच पोटच्या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या या पित्याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.
पोलीस कोठडी आणि पुढील तपास
या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हरिष याला न्यायालयाने 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे आणि अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने पार पाडली. सुटका करण्यात आलेल्या मुलींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पसरलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



