मुंबईठाणे
Trending

Santacruz Fire News : सांताक्रुझमध्ये गॅस दुरुस्तीदरम्यान भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांसह 4 जण गंभीर जखमी

Santacruz Gas Pip Line Accident News : स्फोटाची तीव्रता इतकी की शेजारील वृद्ध व्यक्ती बाजूला फेकला गेला; घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल

मुंबई | मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात गुरुवारी सायंकाळी एका घरात गॅस स्टोव्ह दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह गॅस दुरुस्त करणारा कारागीर असे एकूण चार जण गंभीर भाजले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, आजूबाजूच्या घरांना मोठे हादरे बसले असून परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत.

दुरुस्ती करताना झाला काळाचा घाला

सांताक्रुझ पूर्व येथील गावडे यांच्या घरात हा अपघात घडला. गुरुवारी सायंकाळी घरात गॅस स्टोव्ह बिघडल्याने दुरुस्तीसाठी जावेद अब्दुल शेख (30 वय) या कारागिराला बोलावण्यात आले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि क्षणार्धात घरात आगीचा भडका उडाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की शेजारी बसलेला एक वृद्ध नागरिक अक्षरशः बाजूला फेकला गेला, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

गंभीर जखमींची नावे

या स्फोटात खालील चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत:
1.सुमती रमेश गावडे (वय 65)

2.अवंतिका अजय गावडे (वय 44)

3.यश गावडे (वय 10)

4 जावेद अब्दुल शेख (वय 30, गॅस कारागीर)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गॅस हाताळताना झालेली चूक किंवा तांत्रिक त्रुटीमुळे हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0