मुंबईठाणे

Mulund Breaking News: मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी!

Mulund Latest Breaking News : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ रिक्षा आणि कारवर पडला सिमेंटचा ढिगारा; सुरक्षेच्या नियमांचा फज्जा उडाल्याने नागरिकांमध्ये संताप

मुंबई | मुंबईतील मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर आज शनिवारी दुपारी 12.20 च्या सुमारास मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. मेट्रोच्या खांबाचा सिमेंटचा भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि कारवर पडला. या भीषण अपघातात रिक्षातील प्रवाशांचा चेंदामेंदा झाला असून, रामधन यादव या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना काय?

मुलुंडच्या एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोचे गर्डर आणि स्लॅब बसवण्याचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ही प्रक्रिया सुरू असताना अचानक स्लॅबचा एक मोठा भाग निखळून खाली पडला. यावेळी खालून जाणाऱ्या रिक्षावर हा भाग पडल्याने रिक्षेचा अक्षरशः पत्र्याचा डबा झाला. या अपघातावेळी परिसरात कोणतीही बॅरिकेड्स लावलेली नव्हती, ज्यामुळे ही जीवितहानी झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

हताहत झालेल्यांची माहिती (उपासनी रुग्णालय)

1.रामधन यादव (मृत): रुग्णालयात आणण्यापूर्वीच यांचा मृत्यू झाला होता.

2.राजकुमार इंद्रजीत यादव (45 वर्षे): प्रकृती अत्यंत गंभीर असून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

3 महेंद्र प्रताप यादव (52 वर्षे): प्रकृती स्थिर असून रुग्णालयात दाखल आहेत.

4.दीपा रुहिया (40 वर्षे): प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

सुरक्षेचा अभाव नडला!

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅरिकेड्स हटवण्यात आले होते. मात्र, इतके मोठे गर्डर चढवण्याचे काम सुरू असतानाही तेथे आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. महापौर रितू तावडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

बचावकार्य आणि तपास

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 108 रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या रस्त्यावरील मलबे हटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी एलबीएस रोडवरील वाहतूक वळवली आहे. मेट्रो प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0