क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Virar Cyber Fraud : डिजिटल अरेस्टचा विळखा तोडला! सायबर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाचे 61 लाख 68 हजार रुपये मिळवून दिले परत; 5 महिन्यांच्या पाठपुराव्याला यश

Virar Latest Cyber Fraud News : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले; सायबर पोलिसांनी 10 संशयित बँक खात्यांवर घातली टाच; न्यायालयात पाठपुरावा करून रक्कम मूळ खात्यात जमा

विरार/माणिकपूर | माणिकपूर पोलीस ठाणे Manikpur Police Station हद्दीतील एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सॲपवर एक व्हिडीओ कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण ‘सीबीआय’चे पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तक्रारदाराला धमकावले. “तुमचा मोबाईल क्रमांक संशयास्पद कारवायांमध्ये गुंतला असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे,” असे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ (Virtual House Arrest) च्या नावाखाली तासनतास दबावाखाली ठेवले. या भीतीपोटी तक्रारदाराने आपली आयुष्यभराची पुंजी संशयास्पद बँक खात्यांमध्ये वर्ग केली. Virar Latest Crime News

सायबर पोलिसांची तातडीची कारवाई

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने 27 सप्टेंबर 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी तातडीने NCCRP पोर्टलवर या प्रकरणाची नोंद केली. तक्रार वेळेत झाल्यामुळे फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये फिरत असतानाच पोलिसांनी ती गोठवण्यास (Freeze) सुरुवात केली.

10 बँक खात्यांचा छडा आणि 5 महिन्यांचा पाठपुरावा

तपासादरम्यान ही रक्कम 10 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत आणि त्यांच्या पथकाने या बँकांशी सतत पत्रव्यवहार केला आणि त्यापैकी ७ बँकांमधील रक्कम पूर्णपणे थांबवण्यास यश मिळवले. ही गोठवलेली रक्कम पुन्हा तक्रारदाराला मिळण्यासाठी न्यायालयात याचिका सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सायबर पोलिसांनी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करून ही रक्कम परत करण्याचे आदेश मिळवले.

ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू

सलग 5 महिने बँका आणि न्यायालयाशी पाठपुरावा केल्यानंतर, अखेर 61 लाख 68 हजार 429 रुपये तक्रारदाराच्या मूळ खात्यात जमा करण्यात आले आहेत. पोलिसांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्यांना या रकमेचा एक प्रतिकात्मक चेक सुपूर्द केला. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांचे आभार मानले.

यांनी केली यशस्वी कामगिरी

ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे आणि त्यांच्या संपूर्ण सायबर पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0