मुंबईठाणे
Trending

Sunetra Pawar : ऐतिहासिक क्षण! सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; राजभवनवर दिमाखदार शपथविधी संपन्न

Sunetra Pawar Became First DCM Of Maharashtra : अजितदादांच्या निधनानंतर वहिनींकडे राज्याची धुरा; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

मुंबई | महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर गेल्या 65 वर्षांत जे घडले नाही, ते आज घडले आहे. सुनेत्रा पवार यांनी आज संध्याकाळी 5 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास रचला. राजभवन येथील ‘लोक भवन’ (दरबार हॉल) मध्ये झालेल्या अवघ्या 10 ते 12 मिनिटांच्या एका साध्या पण अत्यंत प्रभावी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याचे महत्त्वाचे मुद्दे

प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष, कॅबिनेटमधील अनेक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

घोषणाबाजी: शपथविधीदरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा अमर रहे’ आणि ‘वहिनीसाहेब आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पवार कुटुंबाची भूमिका: सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र जय पवार उपस्थित होते, तर पार्थ पवार बारामतीतच थांबल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0