पुणे

Pune Sinhagad Road Police News : पुण्यात सायलेन्सर विरोधात कारवाई, कर्कश आवाजामुळे होत होता त्रास

Pune Sinhagad Road Police Took Action Against Modify Bike Silencer सिंहगड रोड पोलीसांची कारवाई; बुलेट गाडीचे सायलेन्सर मध्ये फेरबदल करुन कर्कश आवाज करुन जोर जोरात दुचाकी पळविणा-या वाहन चालकांवर कारवाई

पुणे :- फॅन्सी नंबरप्लेट, ट्रिपलसिट वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे, बुलटे वाहनाचे सायलेन्सरमध्ये Modification केलेबाबत कारवाई करण्यात आली.26 मार्च आणि 27 मार्च रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव पुलाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3 पुणे शहर यांचे आदेशाने नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकुण 117 दुचाकी वाहने ताब्यात घेतली. कर्कश आवाजामुळे त्रास होत होता.

एकुण 33 बुलेट वाहन चालकांवर मोटर वाहन कायदयान्वये विविध तरतुदींचा भंग केलेबाबत कारवाई केली. त्यापैकी 11 वाहने मोटर वाहन कायदा कलम 207 प्रमाणे त्याबाबत घेतली होती. त्यांचेवर Modified सायलेन्सर बसविलेबाबत कारवाई केली. संबंधित बुलेट मालकांकडुन त्यांचे बुलेटचे Modified केलेले सायलेन्सर काढून घेतले. त्याचप्रमाणे वाहन मालकांकडुन वाहनांना Original सायलेन्सर लावुन घेतले. तसेच मोटर वाहन कायदयामधील इतर तरतुदीनुसार ट्रिपलसिट, फॅन्सी नंबरप्लेट व Modified सायलेन्सर बसविलेबाबत एकुण 53 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस पथक
संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -03 पुणे शहर भिमराव टेळे, सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग पुणे शहर तथा अतिरिक्त कार्यभार सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक, आत्मराम आहिरे पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड रोड वाहतुक विभाग पुणे, पोलीस अंमलदार, धनंजय गिरीगोसावी, दयानंद कांबळे, मल्हारी सोनकांबळे, व आरसीपी -3 प्लाटुन यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0