पुणे
Trending

Maharashtra Breaking News : महाराष्ट्र हादरला! राज्याचे लाडके ‘दादा’ हरपले; विमान अपघातात अजित पवार यांचे निधन

Baramati Ajit Pawar Latest News : बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा; बाजारपेठा बंद, समर्थकांचा रुग्णालयाबाहेर जनसागर

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, त्यांचे निवासस्थान असलेल्या बारामतीमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. सकाळपासूनच बारामती शहर आणि परिसरातील सोमेश्वर, पणदरे, सुपा, शिर्सुफळ यांसारख्या ग्रामीण भागातील बाजारपेठा उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.

रुग्णालयाबाहेर जनसागराचा आक्रोश

अजित पवार यांना बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तिथे मोठी गर्दी केली. यावेळी आपल्या नेत्याला गमावल्याच्या दुःखात कार्यकर्ते हंबरडा फोडून रडताना दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

भावूक क्षण: रोहित पवारांना अश्रू अनावर

आमदार रोहित पवार हे मेडिकल कॉलेज परिसरात दाखल झाले तेव्हा त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. रडतच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या काकांच्या जाण्याने रोहित पवार पूर्णपणे खचलेले पाहायला मिळाले. दुसरीकडे, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी हसन मुश्रीफ यांनाही प्रतिक्रिया देताना शब्द सुचत नव्हते; कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांनाही अश्रू अनावर झाले.

कुटुंबीयांची बारामतीकडे धाव; सुप्रिया सुळेंचे भावूक स्टेटस

अपघाताची बातमी समजताच अजित पवार यांच्या भगिनी खा. सुप्रिया सुळे आणि पत्नी सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘Devastated’ (आम्ही उद्धवस्त झालो आहोत) असा एकच शब्द लिहून आपल्या मनातील खोल दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0