मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “शिंदे गट म्हणजे भाजपचे अंगवस्त्र!” संजय राऊतांची जहरी टीका; मुंबईच्या महापौरपदावरून महायुतीत कलगीतुरा

Sanjay Raut On Eknath Shinde : उदय सामंत गटासह भाजपमध्ये विलीन होणार? राऊतांचा खळबळजनक दावा; महापुरुषांच्या अवमानावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नसला तरी, त्यावरून सुरू असलेले राजकारण आता टोकाला पोहोचले आहे. “शिंदे शिवसेना हे भाजपचे अंगवस्त्र आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल आणि शिंदे गट निमूटपणे त्यांना पाठिंबा देईल, असा दावाही राऊतांनी यावेळी केला.

“महापौरपदासाठी केवळ साडी-चोळी पदरात पडेल” शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनाकडे कूच केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, “शिंदे गट कितीही रुसून बसला तरी शेवटी त्यांना भाजपसमोर झुकावेच लागणार आहे. फार तर एखादी साडी-चोळी (काही पदे) पदरात पाडून घेऊन ते गप्प बसतील. त्यांना बाळासाहेब ठाकरे वंदनीय नसून मोदी-शहा वंदनीय आहेत.”

कोश्यारी आणि महाजनांवरून मुख्यमंत्र्यांना दंडवत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाहीर झालेल्या पद्मभूषण पुरस्कारावरून राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. “छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्यांना केंद्राने सन्मानित केले आणि मुख्यमंत्री त्याचे समर्थन करत आहेत. जर महाराष्ट्राचा अपमान मुख्यमंत्र्यांना ‘गंमत’ वाटत असेल, तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत मंत्री गिरीश महाजन यांनीही भाजपची ‘महापुरुष विसरण्याची’ परंपरा जपली असल्याची टीका त्यांनी केली.

उदय सामंत भाजपमध्ये जाणार?

राऊतांचा नवा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे शिंदे गटात येतील, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना राऊतांनी उलट दावा केला की, “स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहेत. दावोस दौऱ्यात यावर काय चर्चा झाली, हे लवकरच बाहेर येईल. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक असून अशा वावड्यांमध्ये काहीही तथ्य नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0