Mumbai Gutkha Seized : सांताक्रुझमध्ये गुन्हे शाखेचा मोठा छापा; 50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांना बेड्या

Mumbai Santacruz Crime Branch Seized Gutkha : प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे मालमत्ता कक्षाची धडक कारवाई; दौलत नगर परिसरातून मोठ्या प्रमाणावर पानमसाला व रोकड हस्तगत
मुंबई l मुंबईत शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याच्या तस्करीविरोधात गुन्हे शाखेने Mumbai Santacruz Crime Branch आपली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे सांताक्रुझ (पश्चिम) परिसरात मालमत्ता कक्षाने (Property Cell) छापा टाकून तब्बल 50 लाख 11 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. Mumbai Crime Branch Latest News
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई मुंबई शहरात प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर मालमत्ता कक्षाला सांताक्रुझमधील दौलत नगर परिसरात गुटख्याचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, 25 जानेवारीच्या रात्रीपासूनच पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता.
दोन ठिकाणी छापे आणि जप्ती 26 जानेवारी 2026 रोजी पहाटे च्या सुमारास मालमत्ता कक्षाच्या पथकाने दौलत नगरमधील राजस्थानी मशिदीजवळ असलेल्या ‘आय प्लॉट’ आणि त्याच्या लगतच्या दोन ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत पोलिसांना विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची पोती सापडली.
जप्त मुद्देमाल: विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला (किंमत 47,73,600 रुपये) आणि 2,37,500 रुपयांची रोख रक्कम.
एकूण किंमत: 50 लाख 11 हजार 100 रुपये.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींविरुद्ध सांताक्रुझ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 124, 223, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आता गुन्हे शाखेचा मालमत्ता कक्ष करत आहे.
यांनी केली यशस्वी कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन, प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, जितेंद्र भारती, दादा गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.


