क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Police News : ठाणे पोलिसांची माणुसकी! ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत मतिमंद बालकाचा पालकांशी यशस्वी पुनर्मिलाप

Thane Police Operation Muskan : मर्यादित माहितीच्या आधारे शोध मोहीम; समाजमाध्यमे ठरली निर्णायक दुवा; महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर माय-लेकाची गळाभेट

ठाणे l ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे Thane Crime Branch शाखेअंतर्गत असलेल्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU) ने ‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत एका 17 वर्षीय मतिमंद बालकाचा शोध घेऊन त्यास त्याच्या पालकांच्या हवाली केले आहे. मतिमंदत्वामुळे स्वतःबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देऊ न शकणाऱ्या या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वापरलेली कल्पकता आणि समाजमाध्यमांची ताकद यामुळे एका कुटुंबाचे हरवलेले हास्य पुन्हा परतले आहे. Thane Police Operation Muskan

रेल्वे प्लॅटफॉर्मवर आढळले होते बालक 19 डिसेंबर 2025 रोजी हा 17 वर्षांचा मुलगा ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर विनापालक आणि गोंधळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तो मतिमंद असल्याने स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगू शकत नव्हता. खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यास माटुंगा येथील बालगृहात दाखल केले होते. 9 जानेवारी 2026 रोजी सीपीयूचे पोलीस हवालदार तानाजी गायकवाड यांनी बालगृहास भेट दिली असता, त्यांना या बालकाची माहिती मिळाली.

मर्यादित शब्दांतून शोध घेण्याचे आव्हान तपासादरम्यान बालकाने ‘आलमगीर’ (वडिलांचे नाव), ‘नमाज’ आणि ‘मुंब्रा’ यांसारखे मोजकेच शब्द उच्चारले. या त्रोटक माहितीच्या आधारावर सीपीयू पथकाने मुंब्रा आणि शिळ-डायघर परिसरात शोध सुरू केला. मात्र, तेथील पोलीस ठाण्यांत कोणतीही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद नव्हती.

समाजमाध्यमे आणि धार्मिक संस्थांची मदत

मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सामाजिक जाळ्याचा आधार घेतला. स्थानिक मशिदींचे मौलवी, धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि शाळांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर मुलाचा फोटो प्रसारित करण्यात आला. या प्रयत्नांना यश आले आणि 23 जानेवारी रोजी मुलाची आई मोहीबोनीसा यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मुलाचे नाव मोहम्मद इमरान आलमगीर असल्याचे निष्पन्न झाले. व्हिडिओ कॉलवर मुलाने आपल्या आईला ओळखताच माय-लेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सुरक्षित सुपूर्दगी बालकल्याण समितीच्या (CWC) आदेशानुसार, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मोहम्मदला त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.

अभिमानास्पद कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीयू पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि महिला पोलीस शिपाई यादव यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0